ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ Final) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला. टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेनंतर आता आयसीसीकडून टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा करण्यात आली आहे. (icc team of the tournament of t20 world cup 2026)
आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम म्हणजेच टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा (icc team of the tournament of t20 world cup 2026) केली आहे. या संघात भारताचे सर्वाधिक चार खेळाडू आहेत. यामध्ये संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघातून कोणालाही निवडण्यात आलेले नाही. तर दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी दोन, इंग्लंडचे दोन आणि वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि पाकिस्तानचा प्रत्येकी एका खेळाडूचा टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये समावेश आहे.(icc team of the tournament of t20 world cup 2026)
संजू आणि इशानने 300 पेक्षा जास्त धावा- (sanju samson ishan kishan jasprit bumrah hardik pandya in icc team of the tournament)
संजू सॅमसनने पाच सामन्यांमध्ये 199 च्या स्ट्राईक रेटने 321 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने स्पर्धेत 14 विकेट्स घेतल्या, ज्यात अंतिम सामन्यातील चार विकेट्सचा समावेश आहे. हा टी-20 विश्वचषक इशान किशनसाठी देखील उल्लेखनीय होता. इशान किशनने तीन अर्धशतके आणि 193 च्या स्ट्राईक रेटसह 317 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात इशानने भारताकडून 77 धावा केल्या. त्याने अंतिम सामन्यात अर्धशतकही झळकावले. हार्दिक पांड्याने 9 सामन्यात 217 धावा केल्या आणि 9 विकेट्स पटकावल्या.
पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानचा समावेश, एडन मार्करम कर्णधार- (team of the tournament of t20 world cup-2026)
टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानचा या संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने 76.60 च्या सरासरीने 383 धावा केल्या आणि टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम याला कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. त्याने तीन अर्धशतकांसह 286 धावा केल्या. हार्दिक व्यतिरिक्त, इंग्लंडचा विल जॅक्स आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे. जॅक्स चार सामन्यात सामनावीर ठरला.
गोलंदाज म्हणून कुणाकुणाला निवडले? (icc team of the tournament of t20 world cup-2026)
जसप्रीत बुमराहसोबत एनगिडी आणि मुझारबानी हे वेगवान गोलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी आणि झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझारबानी जसप्रीत बुमराहसोबत वेगवान गोलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे. मुझारबानीने सहा सामन्यात 13 विकेट्स पटकावल्या होत्या. तर एनगिडीने सात सामन्यात 12 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा आदिल रशीद हा 13 बळी घेणारा एकमेव आघाडीचा फिरकी गोलंदाज आहे. फक्त चार सामन्यात 13 विकेट्स घेणाऱ्या अमेरिकेचा शॅडली व्हॅन शाल्कविक याची 12 वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
आयसीसीची टीम ऑफ द टूर्नामेंट- (icc team of the tournament of t20 world cup 2026)
- साहिबजादा फरहान
- संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
- इशान किशन
- एडन मार्करम (कर्णधार)
- हार्दिक पंड्या
- विल जॅक्स
- जेसन होल्डर
- जसप्रीत बुमराह
- लुंगी एनगिडी
- आदिल रशीद
- ब्लेसिंग मुजरबानी
- शॅडली व्हॅन शाल्कविक (राखीव खेळाडू)
