India vs Pakistan legends league 2026 LIVE Match : क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित लढत म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान आहे. एशियन लेजेंड्स लीग 2026 च्या दुसऱ्या हंगामात रविवार, 2 ऑगस्ट रोजी हा महामुकाबला रंगणार आहे. स्पर्धेतील हा सहावा सामना लुसाका येथील लोटस स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर खेळवला जाईल. शिखर धवन, दिनेश कार्तिक, सुरेश रैना आणि हरभजन सिंह यांसारख्या दिग्गज भारतीय स्टार खेळाडूंनी सजलेला इंडियन रॉयल्स संघ आपला पहिला सामना जिंकून पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. तर दुसरीकडे, पाकिस्तान पँथर्स संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला असल्याने या सामन्यात पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
मागील सामन्यांची कामगिरी
आपल्या पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करत भारत रॉयल्सने बांगलादेश टायगर्सचा 19 धावांनी पराभव केला होता. पाकिस्तान पँथर्सला एशियन स्टार्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 85 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
इंडिया रॉयल्स विरुद्ध पाकिस्तान पँथर्स सामना कधी, कुठे, किती वाजता खेळला जाईल?
इंडियन रॉयल्स विरुद्ध पाकिस्तान पँथर्स एशियन लेजेंड्स लीग 2026 चा सहावा सामना रविवार, 2 ऑगस्ट रोजी लुसाका येथील लोटस स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळला जाईल. जो भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) दुपारी 4:00 वाजता सुरू होईल.
इंडिया रॉयल्स विरुद्ध पाकिस्तान पँथर्स सामना थेट (live) कसा पाहावा?
तुम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान एशियन लेजेंड्स लीग 2026 चा सहावा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क्सवर टीव्हीवर पाहू शकता. तुम्ही IND vs PAK सामना फॅनकोडच्या ॲप आणि वेबसाइटवर ऑनलाइन थेट पाहू शकता.
एशियन लीजेंड्स लीगचा हा दुसरा हंगाम आहे, जो 30 जुलै रोजी सुरू झाला असून, त्याचा अंतिम सामना 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. पहिल्या हंगामात, अंतिम सामन्यात एशियन स्टार्सकडून पराभूत झाल्यामुळे भारत उपविजेता ठरला होता. एशियन लीजेंड्स लीग टी-20 स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामासाठी आशियातील माजी क्रिकेटपटू पुन्हा मैदानात उतरत आहेत. एकूण 19 सामने नियोजित असून, 2 ऑगस्ट रोजी होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरेल अशी अपेक्षा आहे.
भारतीय रॉयल्स संघ : शिखर धवन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषी धवन, अंबाती रायुडू, मनप्रीत गोनी, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, नमन ओझा, सुदीप त्यागी, सुरेश रैना, शाहबाज नदीम, फैज फजल, हरभजन सिंग, अनुरीत सिंग, शादाब जकाती, पवन नेगी.
पाकिस्तान पँथर्स संघ : उमर अकमल, मोहम्मद हाफीज, सोहेल तन्वीर, वहाब रियाझ, अब्दुर रहमान, सईद अजमल, राहत अली, कामरान अकमल, शर्जील खान, यासिर शाह, सामी अस्लम, शोएब मलिक, राणा नईम अनव
हे ही वाचा -
