एक्स्प्लोर

India Women's Semifinal Scenario : टीम इंडिया वर्ल्डकपमधून OUT...? चक्रावून टाकणारं समीकरण, पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरला पण संपूर्ण गेमच फिरला

How India can qualify for Women's T20 World Cup semi-finals : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रविवारी भारतीय महिला संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

How India can qualify for Women's T20 World Cup semi-finals : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC Women's T20 World Cup 2026) मध्ये रविवारी भारतीय महिला संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्याचा निकाल सेमीफायनलच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पुढील फेरीत आपले स्थान जवळपास पक्के केले आहे, तर भारताचा अंतिम चारमधील प्रवास थोडा कठीण दिसत आहे. विशेष म्हणजे, भारताच्या सेमीफायनलच्या आशा दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीवरही अवलंबून असणार आहेत.

जर दक्षिण आफ्रिका आणि भारत दोन्ही जिंकले तर... (India Women's Semifinal Scenario)

जर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा पराभव केला, पण त्यांचा नेट रन रेट (NRR) भारतापेक्षा सरस नसेल, तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला हरवून थेट सेमीफायनल गाठू शकतो. पण जर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला हरवले आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला, तर मात्र ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ पुढील फेरीत प्रवेश करतील आणि भारताचे आव्हान संपुष्टात येईल.

ऑस्ट्रेलियाकडून हरूनही भारत कसा पोहोचू शकतो सेमीफायनलमध्ये? (How can India reach semi-finals despite losing to Australia?)

क्रिकेटमध्ये समीकरणे वेगाने बदलतात. एका विशिष्ट समीकरणानुसार, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना हरला तरीही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो. रविवारीच दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातही सामना होणार आहे. या सामन्याच्या निकालानंतरच भारतीय संघ मैदानात उतरेल. जर दक्षिण आफ्रिकेचा संघ बांगलादेशविरुद्ध पराभूत झाला, तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून हरला तरीही अंतिम चारमध्ये पोहोचेल. याचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे आणि ते आपले सर्व सामने जिंकून पहिल्या क्रमांकावर कायम राहतील.

नेट रन रेट ठरणार गेम चेंजर

सध्या भारतीय संघाचा नेट रन रेट चांगला असल्याने संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेश कडून पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ मागेच राहील (किंवा बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर येईल). अशा स्थितीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला, तरीही चांगल्या नेट रन रेटमुळे दुसऱ्या स्थानावर कायम राहू शकतो. याच मुख्य कारणामुळे ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊनही टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जागा पक्की करू शकते.

सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे? (India vs Australia Women's T20 World Cup 2026)

जरी गणिताचे समीकरण भारताच्या बाजूने असले, तरी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कोणत्याही समीकरणावर अवलंबून न राहता, ऑस्ट्रेलियाला धूळ चारून थेट विजयासह सेमीफायनलचे तिकीट पक्के करण्याचा प्रयत्न करेल. रविवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सामना सुरू होईल, हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) आणि जिओ हॉटस्टार (JioHotstar) वर लाईव्ह पाहता येईल.

हे ही वाचा -

ENG vs NZ 3rd Test : थर्ड अंपायर स्क्रीनकडे पाहत होते, बेन स्टोक्सने कीवी खेळाडूशी केलं असं काही की, सगळेच चक्रावले; ICC करणार कारवाई?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
IND vs ENG 2nd ODI: कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
ICC :  वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदताच क्रिकेटप्रेमींनी संभाव्य समीकरण शोधून काढलं
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदलताच क्रिकेटप्रेमींनी अंदाज बांधला
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget