Harmanpreet Kaur Jersey Number: 84 वरुन 7 अन् मग 23...एक सल्ला अन् एका वर्षात नशीब बदललं?; हरमनप्रीत कौरच्या जर्सी क्रमांकाची रहस्यमय स्टोरी
Harmanpreet Kaur Jersey Number: हरमनप्रीत कौरने ज्यावेळी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्यावेळी तिचा जर्सी क्रमांक 84 होता.

Harmanpreet Kaur Jersey Number: हनमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 मधील आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (ICC Womens World Cup 2025) जिंकला. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हनमनप्रीत कौरचं (Harmanpreet Kaur) सर्वत्र कौतुक होत आहे. याचदरम्यान आता हरमनप्रीत कौरच्या जर्सी क्रमांकाची (Harmanpreet Kaur Jersey Number) देखील चर्चा रंगली आहे.
हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) ज्यावेळी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्यावेळी तिचा जर्सी क्रमांक 84 होता. हनमनप्रीत कौरने 1984 च्या दंगलीतील शहीदांच्या सन्मानार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ तिच्या आईने निवडलेला 84 क्रमांकाचा भारताच्या जर्सीसाठी क्रमांक निवडला होता. कालांतराने 84 वरुन 7 नंबरची जर्सी हरमनप्रीत कौरने निवडली. अनेक वर्षे, हनमनप्रीत कौरने तिच्या पाठीवर 7 क्रमांक घातला आणि तो तिच्या आक्रमक शैलीचे, निर्भय नेतृत्वाचे आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या आत्मविश्वासाचे प्रतीक बनला. तथापि, नोव्हेंबर 2024 मध्ये, मुंबईत भारताच्या नवीन एकदिवसीय जर्सीच्या लाँचिंग दरम्यान, हरमनप्रीतने 7 ऐवजी 23 क्रमांक घातल्याने अनेकांना आश्चर्यचकित केले.
प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ संजय बी जुमानी यांनी हरमनप्रीत कौरला दिला होता सल्ला- (Harmanpreet Kaur Jersey Number)
प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ संजय बी जुमानी यांनी हरमनप्रीत कौरला 23 हा नंबर निवडण्याचा सल्ला दिला होता. 23 हा क्रमांक भाग्यवान ठरू शकतो असं हरमनप्रीत कौरला सांगण्यात आले. त्यानंतर हरमनप्रीत कौरने तिच्या एकदिवसीय जर्सी क्रमांक 7 वरून 23 वर बदलला आणि पुढच्याच वर्षी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकल्याची चर्चा रंगली आहे.
हरमनप्रीत कौरची कारकीर्द- (Harmanpreet Kaur International career)
हरमनप्रीत कौरचा जन्म 8 मार्च 1989 रोजी पंजाबमधील मोंगा येथे झाला. 36 वर्षीय हरमनप्रीत कौरने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हरमनप्रीत कौरने 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने भारतासाठी 6 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 182 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने अनुक्रमे 200, 4409 आणि 3654 धावा केल्या आहेत.
















