एक्स्प्लोर

Hardik Pandya Ind vs Afg ODI : हार्दिक पांड्याचा पुन्हा गेम झाला, अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, बंगळुरूमध्ये नेमकं काय घडलं?

India vs Afghanistan ODI : भारतीय क्रिकेट संघाला आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे (ODI) मालिकेपूर्वी एक मोठा धक्का बसला आहे.

Hardik Pandya Ruled OUT India vs Afghanistan ODI : भारतीय क्रिकेट संघाला आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे (ODI) मालिकेपूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या पायाच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. बंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) मध्ये आठवडाभर फिटनेस टेस्ट आणि सराव केल्यानंतर त्याला खेळण्यासाठी हिरवा कंदिल मिळाला होता, परंतु ऐनवेळी झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघातून माघार घ्यावी लागली आहे. बीसीसीआय (BCCI) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक आता पुनर्वसनासाठी (Rehabilitation) बंगळुरूमध्येच थांबणार आहे.

ऐनवेळी दुखापत बळावली (Hardik Pandya suffers fresh injury setback)

'हिंदुस्तान टाइम्स डिजिटल'शी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, "हार्दिकने सुरुवातीला सर्व आवश्यक चाचण्या उत्तीर्ण केल्या होत्या आणि त्याला मंजुरीही मिळाली होती. पण ऐनवेळी त्याच्या क्वॉड्रिसेप्स (Quadriceps Strain - मांडीचे स्नायू) ला ताण आल्यामुळे तो अफगाणिस्तान मालिकेबाहेर झाला आहे. त्याला जवळपास दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे." हार्दिकच्या जागी संघात कोणाला स्थान मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, जुलै महिन्यात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील त्याच्या सहभागावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रोहित शर्मा सज्ज, विराट कोहली बाहेर

दुसरीकडे, भारतीय वनडे संघाचे काही सदस्य मोहालीत एकत्र येतील आणि गुरुवारी धरमशालासाठी रवाना होण्यापूर्वी सराव करतील. कर्णधार रोहित शर्मा या मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तर माजी कर्णधार विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार असून, त्याच्या जागी यशस्वी जैस्वालची संघात निवड करण्यात आली आहे.

आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरी

हार्दिक पांड्याने नुकतेच आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. या 19व्या हंगामात त्याला पाठीच्या त्रासामुळे (Back Spasms) काही सामन्यांना मुकावे लागले होते. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी राहिला, ज्यामुळे त्याच्या कर्णधारपदावर आणि फ्रँचायझीमधील भविष्यावर बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

2027 च्या वर्ल्ड कपसाठी हार्दिक महत्त्वाचा - अजित आगरकर

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की, हार्दिकला 2027च्या वनडे वर्ल्ड कपसाठी तंदुरुस्त ठेवणे हे भारतीय संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणूनच त्याला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. अजित आगरकर म्हणाले की, "हार्दिक हा वनडे संघाचा महत्त्वाचा भाग आहे. जसप्रीत बुमराहप्रमाणेच हार्दिकलाही वनडे क्रिकेटमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त पाहणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. यामुळे हार्दिकला विश्रांती मिळेल आणि नितीश रेड्डी सारख्या तरुण खेळाडूंना टी-20 मध्ये संधी देता येईल."

हे ही वाचा -

ICC चा मोठा दणका! इंग्लंडच्या लॉर्ड्ससह पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमवर कारवाई, क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi Crying : टीम इंडियाचा पराभव होताच वैभव सूर्यवंशी भर मैदानात एकटा बसून रडू लागला; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यानंतर काय घडलं?, VIDEO
टीम इंडियाचा पराभव होताच वैभव सूर्यवंशी भर मैदानात एकटा बसून रडू लागला; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यानंतर काय घडलं?, VIDEO
Shreyas Iyer Ind vs Eng 5th T20 : आमच्याकडून मोठ्या चुका झाल्या...; क्लीन स्वीप अन् 6 पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरचा संयम सुटला; व्हिलनचा केला पर्दाफाश, नेमकं काय म्हणाला?
आमच्याकडून मोठ्या चुका झाल्या...; क्लीन स्वीप अन् 6 पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरचा संयम सुटला; व्हिलनचा केला पर्दाफाश, नेमकं काय म्हणाला?
Ind vs Eng 5th T20 : गंभीर-अय्यरच्या नावावर 0-4च्या पराभवाचा लाजिरवाणा कलंक! आयर्लंडनंतर इंग्रजांकडून टीम इंडियाची अब्रू वेशीला
गंभीर-अय्यरच्या नावावर 0-4च्या पराभवाचा लाजिरवाणा कलंक! आयर्लंडनंतर इंग्रजांकडून टीम इंडियाची अब्रू वेशीला
Ind vs Eng 5th T20 : इंग्लंडचा पुन्हा मोठा विजय! पाचव्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचा 56 धावांनी पराभव
इंग्लंडचा पुन्हा मोठा विजय! पाचव्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचा 56 धावांनी पराभव
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Embed widget