एक्स्प्लोर

T20 World Cup 2026 Longest Six : शिवम दुबेचा रेकॉर्ड फक्त काही सेकंदांचा पाहुणा! हार्दिक पांड्याने मारला टी-20 वर्ल्डकपमधील सर्वात लांब षटकार, पाहा Video

Hardik Pandya Hits ICC T20 World Cup 2026 Longest Six : टी-20 वर्ल्डकप 2026 च्या 18व्या सामन्यात भारताने नामिबियावर एकतर्फी विजय मिळवला.

Hardik Pandya Hits ICC T20 World Cup 2026 Longest Six : टी-20 वर्ल्डकप 2026 च्या 18व्या सामन्यात भारताने नामिबियावर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजीदरम्यान दोन पॉवर-हिटर्स हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांच्यातील सिक्सरची रोमांचक टक्कर पाहायला मिळाली. दोघांनीही लांबच लांब षटकार ठोकत स्पर्धेतील सर्वात मोठ्या सिक्सरच्या यादीत आपले नाव नोंदवले.

शिवम दुबेचा 107 मीटर षटकार....

भारतीय डावाच्या 15व्या षटकात शिवम दुबेने नामिबियाच्या गोलंदाज बर्नार्ड स्कोल्झच्या पहिल्याच चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेने 107 मीटरचा जबरदस्त षटकार ठोकला. वेगवान चेंडूवर दुबेने ताकदीने फटका मारत हा चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये पाठवला. त्या क्षणी तो स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठरला.

हार्दिक पांड्याने अवघ्या 2 चेंडूत मोडला रेकॉर्ड (Hardik Pandya Hits ICC T20 World Cup 2026 Longest Six)

मात्र, काही क्षणांतच हार्दिक पांड्याने दुबेचा विक्रम मोडला. त्याच षटकात  बर्नार्ड स्कोल्झच्या गोलंदाजीवर लॉन्ग-ऑफच्या दिशेने 109 मीटरचा षटकार ठोकत हार्दिकने स्पर्धेतील सर्वात लांब षटकार आपल्या नावावर केला. हार्दिक पंड्याने अवघ्या 2 चेंडूत रेकॉर्ड मोडला. या सामन्यापूर्वी स्पर्धेतील सर्वात मोठा षटकार कामिंडू मेंडिसने 100 मीटरचा मारला होता. मात्र आता अव्वल दोन स्थानांवर भारतीय खेळाडूंचा कब्जा आहे.

हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी

दरम्यान, भारताने नामिबियावर 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या गट सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 9 बाद 209 धावा केल्या. प्रत्युत्तर नामिबियाचा संघ 18.2 षटकांत 116 धावांवर सर्वबाद झाला.  या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला.

हार्दिक पांड्याने 28 चेंडूत 52 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. हे त्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 25वे अर्धशतक ठरले. फलंदाजीनंतर गोलंदाजीतही त्याने 2 महत्त्वाचे बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सर्वांगीण कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. 

हे ही वाचा -

Ind vs Pak T20 World Cup 2026 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; 4 षटक सामना फिरवणार?, नेमकं काय घडंल?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Embed widget