Hardik Pandya Joins Chennai Super Kings : आयपीएल 2026 संपताच पुढच्या सीझनची म्हणजेच 2027 ची चर्चा जोरात रंगली आहे. सोशल मीडियावर सध्या एकच प्रश्न ट्रेंड होत आहे. हार्दिक पांड्या खरंच मुंबई इंडियन्स (MI) सोडून चेन्नई सुपर किंग्स (CSK) मध्ये जाणार का? या संपूर्ण चर्चेला सुरुवात झाली हार्दिकच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमुळे, पण आता भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनयाने ‘07:07’ चा उल्लेख करत या चर्चेत आणखी मसाला टाकला आहे. 

Continues below advertisement

07:07... हार्दिक पांड्या IPL 2027 मध्ये चेन्नईकडून खेळणार? (Hardik Pandya 07-07 post)

वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सला 30 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. त्या फोटोमध्ये मोबाईलवर ‘07:07’ अशी वेळ दिसत होती. फॅन्सनी लगेच याचा संबंध एमएस धोनीच्या जर्सी नंबर ‘07’ आणि चेन्नई सुपर किंग्सशी जोडला. त्यानंतर सोशल मीडियावर अफवांचा अक्षरशः स्फोट झाला.

Continues below advertisement

हार्दिक अन् अश्विनच्या '07:07' मागील रहस्य (R Ashwin 07-07 Post)

यात आणखी भर घालत अश्विनने एक्सवर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पुन्हा ‘07:07’ चा उल्लेख केला. मथीशा पथिरानाच्या जागी सीएसकेने नवीन प्लॅन तयार करायला हवा का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अश्विनने होकार देत संकेत दिले की हा खेळाडू शिवम दुबेसोबत सीएसकेच्या मिडल ऑर्डरला अधिक धोकादायक बनवू शकतो. त्याचवेळी त्याने इंग्लंडचे स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स आणि जेमी ओव्हरटनबाबतही मोठे संकेत दिले.

हार्दिक खरंच मुंबई सोडणार का?

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल 2026 चा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. गुजरात टायटन्सविरुद्धचा शेवटचा लीग सामना गमावल्यानंतर सीएसके सलग तिसऱ्या वर्षी प्लेऑफच्या बाहेर फेकली गेली. दुसरीकडे हार्दिक पांड्याचाही फॉर्म चिंतेचा विषय ठरला. त्याने 10 सामन्यांत फक्त 206 धावा केल्या आणि अवघे 4 विकेट घेतले. मुंबई इंडियन्सचे बॅटिंग कोच कीरोन पोलार्ड यांनीही हार्दिकच्या नेतृत्वावर थेट भाष्य टाळलं. त्यांनी फक्त इतकंच म्हटलं की, “मॅनेजमेंटला जसं अपेक्षित होतं तसं काहीच घडलं नाही.”

सध्या हार्दिक पंड्या CSK मध्ये जाणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र हार्दिकच्या ‘07:07’ पोस्टनंतर आणि अश्विनच्या सूचक प्रतिक्रियेमुळे क्रिकेटविश्वात चर्चांचा भडका उडाला आहे. आता आयपीएल 2027 च्या आधी आणखी कोणते ट्विस्ट समोर येतात, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा -

IPL Playoffs Highest Run Scorer : कधी IPL वर राज्य केलं, शेवटी लिलावात कुणी विचारलंच नाही; ज्याच्या नावावर प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा, कोण आहे तो खेळाडू?