Hardik Pandya ICC T-20 Rankings 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारताला यावर्षी टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तेव्हापासून तो बॉल आणि बॅटने टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. अलीकडेच, हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही चांगली कामगिरी केली, त्याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला आहे. हार्दिक पांड्या आयसीसी क्रमवारीत नंबर 1 टी-20 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. पांड्याने 2 स्थानांची झेप घेत हा मोठा टप्पा गाठला. भारतीय अष्टपैलू खेळाडूने इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनकडून नंबर-1चा ताज हिसकावून घेतला.
हार्दिक पांड्याने 2024 मध्ये दुसऱ्यांदा आयसीसी पुरुषांच्या टी-20 अष्टपैलू रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. यावरून तो या फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी किती महत्त्वाचा आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या वर्षी हार्दिकने टी-20 क्रिकेटमध्ये 352 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने यावर्षी 16 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. हार्दिकने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शेवटच्या टी-20 सामन्यात चेंडूने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने 3 षटकात केवळ 8 धावा देऊन 1 बळी घेण्याचा महान पराक्रम केला होता. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हरही टाकला.
हार्दिक 244 रेटिंग गुणांसह T20I अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे तर नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी दुसऱ्या स्थानावर आहे. लियाम लिव्हिंगस्टोन 2 स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानावर गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस चौथ्या तर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा पाचव्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी सहाव्या तर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा सातव्या स्थानावर आहे. आयसीसी क्रमवारीत अव्वल-10 अष्टपैलू खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा रोमॅरियो शेफर्ड आठव्या, दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम नवव्या आणि गेरहर्ड इरास्मस दहाव्या स्थानावर आहे.
हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या कसोटी संघाचा भाग नाही. तो बराच काळ कसोटी संघाबाहेर आहे. तथापि, पांड्या लवकरच त्याचा भाऊ कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोद्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
हे ही वाचा -
Sanju Samson : 5 सामन्यांत धडाकेबाज 3 शतकं, दमदार खेळीचं शानदार गिफ्ट, संजू सॅमसन थेट कॅप्टन!