Happy birthday Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह... जसप्रीत बुमराहला 2013 मध्ये कदाचितच कोणी ओळखत असेल. परंतु, आज संपूर्ण जगाभरातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये बुमराहने आपलं स्थान निर्माण केलं आहे. जगातील अनेक जगप्रसिद्ध फलंदाजांनाही बुमराहच्या गोलंदाजीची धास्ती असते. डेथ ओव्हरमध्ये बुमराहच्या गोलंदाजीची बातच और असते. अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये डेथ ओव्हरची धुरा बुमराहच्याच खांद्यावर सोपवण्यात आली होती. तसेच बुमराहने सुद्धा त्याच्यावर दाखवलेला हा विश्वास वेळोवेळी खरा ठरवला आहे. आज भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहचा वाढदिवस. आज जगप्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा हा खेळाडू यशाच्या शिखरावर पोहोचण्याआधी मात्र अनेक कठिण समस्यांचा सामना करावा लागला होता.
जसप्रीत बुमराहचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी अहमदाबादमध्ये झाला. त्याचे वडील जसबीर सिंह यांचा स्वतःचा व्यवसाय होता. तर आई दलजीत प्राथमिक शाळेक शिक्षिका होत्या. जेव्हा जसप्रीत अवघ्या 7 वर्षांचा होता. त्यावेळी त्याच्या डोक्यावरील त्याच्या वडिलांचं छत्र हरपलं. आईने जसप्रीत आणि त्याच्या बहिणीचा सांभाळ केला. ज्या शाळेत बुमराहची आई शिक्षिका होती, त्याच शाळेत त्याने आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं.
क्रिकेटची बुमराहला प्रचंड आवड होती. त्याच्या या क्रिकेटप्रेमाची सुरुवात त्याने घरातूनच केली. जसप्रीत दिवसभर भिंतीच्या दिशेने चेंडू टाकून गोलंदाजी करत असे. एक दिवस आईने वैतागून त्याला सांगितलं, जर खेळायचं असेल तर असा बॉल टाक जेणेकरुन जास्त आवाज होणार नाही. त्यानंतर जसप्रीतने गोलंदाजी करण्यासाठी वेगळी स्टाइल शोधली आणि भिंतीऐवजी त्याने फ्लोर स्कर्टिंग (फरशीला जोडणारा खालचा भाग) वर बॉलिंग करण्यास सुरुवात केली. यातूनच जसप्रीतने यॉर्कर गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.
जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये आपलं पदार्पणचा सामना 4 एप्रिल 2013 रोजी मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या सामन्यात बुमराहने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. या सामन्यात बुमराहने 32 धावा देत 3 फलंदाजांना बाद केलं. आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात 3 विकेट्स घेणारा तो पहिला खेळाडू होता. बुमराहने आतापर्यंत आयपीएलमध्ये 77 सामने खेळले आहेत. यापैकी त्याने 26.59 सरासरीने 82 विकेट्स घेतले. त्याचं आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन म्हणजे 3/7 आहे, जे त्याने 2017 मध्ये केलं होतं. 58 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4.49च्या इकोनॉमीसोबत 103 विकेट घेतले आहेत. यादरम्यान, त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन 27/5 असं आहे. जर टी20 बाबात बोलायचं झालं तर जसप्रीतने 42 सामन्यांमध्ये 51 विकेट्स आपल्या नावे नावे केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :