Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru : आयपीएल 2026 च्या 42 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा (RCB) 4 गडी राखून पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान अधिक मजबूत केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने आरसीबीचे 156 धावांचे आव्हान सहज पेलले. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर झेप घेतली असून, टॉप-4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी यशस्वी पाऊल टाकले आहे.

Continues below advertisement

आरसीबीची खराब सुरुवात

आरसीबीसाठी विराट कोहली आणि जेकब बेथल जोडीने डावाची सुरुवात केली. मात्र, सुरुवातीलाच मोहम्मद सिराजने बेथलला (5) स्वस्तात बाद करत पहिला धक्का दिला. आक्रमक फॉर्मात दिसणाऱ्या विराट कोहलीने 13 चेंडूंत 28 धावा (5 चौकार, 1 षटकार) केल्या, पण कागिसो रबाडाने त्याला बाद करत आरसीबीला दुसरा मोठा धक्का दिला.

Continues below advertisement

मिडल ऑर्डरची घसरगुंडी

विराट बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव सावरू शकला नाही. कर्णधार रजत पाटीदार (19) आणि टिम डेव्हिड (9) यांना रशीद खानने तंबूचा रस्ता दाखवला. जितेश शर्मा (1) आणि कृणाल पांड्या (4) हेदेखील फलंदाजीत अपयशी ठरले. एका बाजूने देवदत्त पडिक्कलने 24 चेंडूंत 44 धावांची झुंजार खेळी केली, मात्र रशीद खानने त्याला बाद करत आरसीबीची मोठी धावसंख्या उभारण्याची आशा संपवली. शेवटच्या षटकांत रोमारियो शेफर्डने 17 आणि भुवनेश्वर कुमारने नाबाद 15 धावांचे योगदान दिले, तर व्यंकटेश अय्यरने 12 धावा केल्या. अर्शद खानने गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक, म्हणजेच तीन बळी घेतले. जेसन होल्डर आणि रशीद खान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 

गुजरात टायटन्सची धमाकेदार सुरुवात

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने दिलेल्या 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरात टायटन्सच्या डावाची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यासोबत झाली. गिलने वेगवान सुरुवात केली, पण त्यानंतर भुवनेश्वर कुमारने 42 धावांवर गुजरातला पहिला धक्का दिला. त्याने साई सुदर्शनला बाद केले. सुदर्शनने 5 चेंडूंमध्ये 6 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने 3 बळी घेऊन गुजरातचा मार्ग कठीण केल्या.

त्यानंतर भुवनेश्वर कुमारने कर्णधार शुभमन गिलच्या रूपाने गुजरात टायटन्सला दुसरा धक्का दिला. गिल 18 चेंडूंमध्ये 43 धावा करून बाद झाला. त्यानंतर, भुवनेश्वर कुमारने 19 चेंडूंमध्ये 39 धावा करून बाद झालेल्या जोस बटलरला बाद करून गुजरात टायटन्सला तिसरा धक्का दिला. त्यानंतर रोमॅरिओ शेफर्डने एकाच षटकात गुजरात टायटन्सला दोन धक्के दिले. त्याने प्रथम शाहरुख खानला बाद केले. शाहरुख 8 चेंडूंमध्ये 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर त्याने तिसऱ्याच चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरला 12 धावांवर बाद केले.

गुजरातची प्लेऑफकडे दमदार कूच

या विजयासह गुजरात टायटन्सने गुणतालिकेत महत्त्वाची झेप घेतली आहे. 9 सामन्यांत 5 विजय आणि 10 गुणांसह गुजरात सध्या पाचव्या स्थानावर आहे आणि टॉप-4 मध्ये प्रवेशासाठी जोरदार स्पर्धेत आहे. दुसरीकडे, आरसीबी 9 सामन्यांत 6 विजयांसह 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

हे ही वाचा -

Virat Kohli : 4, 4, 4, 4, 4... विराट कोहलीची सुसाट बॅटिंग; एकाच ओव्हरमध्ये 5 चौकार ठोकून रचला इतिहास, नेमकं काय घडलं?