GT vs SRH Live Score : गुजरात टायटन्सचा मोठा विजय; सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांनी धुव्वा
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live : दुसऱ्या स्थानावरील सनरायझर्स हैदराबाद आणि तिसऱ्या स्थानावरील गुजरात टायटन्स यांच्यात रंगणारा सामना प्रचंड रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.
किरण महानवरLast Updated: 12 May 2026 10:57 PM

पार्श्वभूमी
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live Update In Marathi : आयपीएल आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं असून आज, 12 मे रोजी दुसऱ्या स्थानावरील सनरायझर्स हैदराबाद आणि तिसऱ्या स्थानावरील गुजरात...More
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live Update In Marathi : आयपीएल आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं असून आज, 12 मे रोजी दुसऱ्या स्थानावरील सनरायझर्स हैदराबाद आणि तिसऱ्या स्थानावरील गुजरात टायटन्स यांच्यात रंगणारा सामना प्रचंड रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. आजचा विजेता प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरू शकतो, तर पराभूत संघाच्या अडचणी वाढणार आहेत.शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सवर तब्बल 77 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे गुजरातचा आत्मविश्वास उंचावला असून संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, हैदराबाद आणि गुजरात या तिन्ही संघांचे 14 गुण आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत नेट रनरेट निर्णायक भूमिका बजावू शकतो.दरम्यान, सनराइजर्स हैदराबादने योग्य वेळी जबरदस्त फॉर्म पकडला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या मागील सामन्यात त्यांनी 33 धावांनी विजय मिळवत आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली. त्या सामन्यात हैदराबादने 4 बाद 235 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र प्लेऑफची स्पर्धा अत्यंत चुरशीची असल्याने त्यांना कोणतीही ढिलाई परवडणारी नाही. हा महत्त्वाचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम येथे संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाणार आहे.अहमदाबाद पिच रिपोर्टअहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. मैदानावरील वेगवान आउटफिल्डमुळे चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळते आणि येथे अनेक हाय-स्कोअरिंग सामने झाले आहेत. नव्या चेंडूने वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला थोडी मदत मिळू शकते. त्यामुळे सुरुवातीचे काही षटके फलंदाजांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. या परिस्थितीचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.पावसाचा व्यत्यय येणार?अहमदाबादमध्ये दिवसा उष्ण वातावरण राहण्याची शक्यता असून संध्याकाळी थोडा गारवा जाणवू शकतो. दुसऱ्या डावात दवाचा प्रभाव अधिक दिसू शकतो, त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या तरी पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने सामना विनाव्यत्यय पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.हे ही वाचा -IND vs AFG Test Squad : शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब
GT vs SRH Live Score : गुजरात टायटन्सचा मोठा विजय; सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांनी धुव्वा
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 56 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) सनरायझर्स हैदराबादवर (SRH) 82 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
गुजरातच्या प्रभावी गोलंदाजीसमोर हैदराबादचा संपूर्ण संघ अवघ्या 86 धावांवर गारद झाला.