GT vs RCB Live Score IPL 2026 : गिल-बटलरच्या वादळापुढे 'आरसीबी' ढेर; गुजरातचा 4 विकेट्सने शानदार विजय

GT vs RCB Live Score IPL 2026 Update In Marathi : गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे एक हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 30 Apr 2026 11:03 PM

पार्श्वभूमी

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Live Update In Marathi : गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे एक हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. हीच...More

GT vs RCB IPL 2026 : गिल-बटलरच्या वादळापुढे 'आरसीबी' ढेर; गुजरातचा 4 विकेट्सने शानदार विजय

आयपीएल 2026 मधील 42वा सामना गुजरात टायटन्सने दमदार शैलीत जिंकत प्लेऑफच्या शर्यतीत आपली दावेदारी अधिक भक्कम केली.


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर 4 विकेट्सने मात केली.


सामन्याची सुरुवात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडण्याने झाली आणि हा निर्णय अक्षरशः सोन्याचा ठरला.


गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आरसीबीच्या फलंदाजांवर दबाव टाकत त्यांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही.


अखेर आरसीबीचा संपूर्ण संघ 19.2 षटकांत 155 धावांवर गारद झाला.


156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी आक्रमक सुरुवात केली.


दोघांनीही जोरदार फटकेबाजी करत सामना पूर्णपणे गुजरातच्या बाजूने झुकवला.


त्यांच्या वादळी खेळीमुळे गुजरातने हा सामना सहज जिंकत 4 विकेट्सने विजय मिळवला.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.