GT vs MI Score IPL 2026 : सलग 4 पराभवानंतर मुंबईचा धमाका; गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा!

Gujarat Titans vs Mumbai Indians Live Update In Marathi IPL 2026 : आयपीएलच्या 30 व्या सामन्यात गुजरात जायंट्सचा सामना आज पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 20 Apr 2026 09:27 PM

पार्श्वभूमी

Gujarat Titans vs Mumbai Indians Live Update In Marathi : आयपीएलच्या 30 व्या सामन्यात गुजरात जायंट्सचा सामना आज पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना गुजरातचे घरचे मैदान...More

GT vs MI Live Score IPL 2026 : तिलक वर्माचे झंझावाती शतक! मुंबई इंडियन्सचे गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचे तगडे आव्हान

आयपीएल 2026 च्या 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने तिलक वर्माच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्स विरुद्ध निर्धारित 20 षटकांत 5 बाद 199 धावांचा डोंगर उभा केला आहे. 


सुरुवातीच्या धक्क्यांनंतर तिलकने फटकेबाजी करत गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.


नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली.


सलामीवीर क्विंटन डी कॉक (13) आणि दानिश मळेवार (2) यांना कागिसो रबाडाने स्वस्तात बाद करत मुंबईला बॅकफूटवर ढकलले. 


मात्र, त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले.


तिलक वर्माने अवघ्या 45 चेंडूंमध्ये नाबाद 101 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता.  दुसऱ्या टोकाकडून नमन धीरने (45 धावा, 32 चेंडू) चांगली साथ दिली.


गुजरात टायटन्सकडून अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने टिच्चून गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत महत्त्वाच्या 3 विकेट्स घेतल्या. 


प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला, मात्र मधल्या षटकांमध्ये धावा रोखण्यात त्यांना अपयश आले.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.