GT vs KKR Live Update : अहमदाबादमध्ये गिलचं 'चक्रीवादळ'; केकेआरचा पालापाचोळा, गुजरातचा धमाका
Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live IPL 2026 Update In Marathi : आयपीएल 2026 मधील 25व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे.
किरण महानवरLast Updated: 17 Apr 2026 11:28 PM

पार्श्वभूमी
GT vs KKR Live Score IPL 2026 Match Update In Marathi : आयपीएल 2026 मधील 25व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना गुजरातच्या...More
GT vs KKR Live Score IPL 2026 Match Update In Marathi : आयपीएल 2026 मधील 25व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना गुजरातच्या होमग्राउंड अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात कोलकाता संघ हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात मैदानात उतरणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये केकेआरला एकही विजय मिळालेला नाही. पंजाब किंग्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांचे खाते उघडले आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने चारपैकी दोन सामने जिंकले आहेत.हेड-टू-हेडमध्ये गुजरातचा दबदबा (GT vs KKR Head to Head Record)आयपीएलमधील दोन्ही संघांच्या आमनेसामनेच्या इतिहासावर नजर टाकली तर गुजरात टायटन्सचा वरचष्मा स्पष्ट दिसतो. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांपैकी गुजरातने तीन वेळा विजय मिळवला आहे, तर कोलकाताला फक्त एकदाच यश मिळाले आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. विशेष म्हणजे, 2023 साली याच मैदानावर केकेआरने गुजरातला 7 विकेट्सनी पराभूत केले होते. मात्र, 2025 मध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात गुजरातने 39 धावांनी विजय मिळवत पुन्हा वर्चस्व सिद्ध केले.पॉइंट्स टेबलमधील स्थितीगुजरात टायटन्सने हंगामाची सुरुवात दमदार करत पहिले दोन सामने जिंकले, पण त्यानंतर सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्या ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था चिंताजनक आहे. पाचपैकी चार सामने गमावले असून एक सामना रद्द झाल्यामुळे त्यांच्याकडे केवळ 1 गुण आहे. त्यामुळे केकेआर सध्या गुणतालिकेच्या तळाशी आहे. आता या सामन्यात गुजरात आपली पकड मजबूत ठेवणार की कोलकाता अखेर विजयाचा श्रीगणेशा करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.गुजरात टायटन्सचा संघ- (IPL 2026 GT Full Squad)शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुमार कुशाग्रा, अनुज रावत, जोस बटलर, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, अर्शद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंग ब्रार, राशिद खान, मानव सुथार, साई किशोर, जयंत यादव, अशोक शर्मा, जेसन होल्डर, टॉम बँटन, पृथ्वी राज येरा, ल्यूक वुडकोलकाता नाईट रायडर्सचा संघ- (IPL 2026 KKR Full Squad)अजिंक्य रहाणे, अंगकृष्ण रघुवंशी, अनुकुल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, कॅमेरॉन ग्रीन, फिन एलन, मथिशा पाथिराना, राहुल सिंग, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, ब्लेसिंग मुझारबानी, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, आकाश दीप
GT vs KKR Live Update : अहमदाबादमध्ये गिलचं 'चक्रीवादळ'; केकेआरचा पालापाचोळा, गुजरातचा धमाका
गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) पाच गडी राखून पराभव केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या केकेआरने, कॅमेरॉन ग्रीनच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 10 गडी गमावून 180 धावा केल्या.
प्रत्युत्तर म्हणून गुजरात टायटन्सने 19.4 षटकांत 5 गडी गमावून 181 धावा केल्या आणि शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना जिंकला.