Ind vs Pak T20 World Cup 2026 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; 4 षटक सामना फिरवणार?, नेमकं काय घडंल?
Ind vs Pak T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक2026 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे.

Ind vs Pak T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक2026 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. पाकिस्तानचा नवा फिरकीपटू उस्मान तारिक सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो राउंड आर्म अॅक्शनमधून गोलंदाजी करतो. या अॅक्शनमुळे बाउन्स रोखता येतो आणि फलंदाजांना खेळणे कठीण होते. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस हाही काही प्रमाणात अशाच प्रकारच्या अॅक्शनने गोलंदाजी करतो.
4 षटक सामना फिरवणार?
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. बहुतांश गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली, मात्र गेरहार्ड इरास्मसच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज अडचणीत सापडले. उजव्या हाताचा ऑफस्पिनर असलेल्या इरास्मसने 4 षटकांत अवघ्या 20 धावा देत 4 महत्त्वाचे बळी घेतले. त्याने ईशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांना बाद केले.
इरास्मस मधूनमधून राउंड आर्म अॅक्शनमधून चेंडू टाकतो. काही वेळा तर तो अंपायरजवळून, विकेटच्या मागूनेही चेंडू टाकत होता. अशाच प्रकारच्या चेंडूवर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा बाद झाले. भारताच्या डावातील 19वे षटकही त्याने टाकले, ज्यामध्ये तीन बळी गेले.
Unfair advantage or smart bowling? 🤔@IrfanPathan, Piyush Chawla & Jatin Sapru share their thoughts on Gerhard Erasmus' action.
— Star Sports (@StarSportsIndia) February 12, 2026
ICC Men’s #T20WorldCup | #INDvNAM | LIVE NOW 👉 https://t.co/aLGrwgVX5o pic.twitter.com/4EvladZTMz
भारत आणि पाकिस्तान सामन्याची खेळपट्टी कशी आहे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. त्या मैदानावरील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. चेंडू पिचवर पडून थोडा थांबतो किंवा खालून येतो, त्यामुळे मोठे फटके मारणे सोपे नसते. उस्मान तारिकने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात 11 बळी घेतले आहेत. एकूण 42 टी-20 सामन्यांत त्याच्या नावावर 70 बळी आहेत.
दरम्यान, भारताने नामिबियावर 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या गट सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 9 बाद 209 धावा केल्या. प्रत्युत्तर नामिबियाचा संघ 18.2 षटकांत 116 धावांवर सर्वबाद झाला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. यापूर्वी पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेला पराभूत केले होते. या विजयासह भारताने गट अ मध्ये अव्वल स्थान मिळवले असून पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
हे ही वाचा -
सरकारचा हिरवा कंदील! जेथे चेंगराचेंगरीत 11 जणांनी जीव गमावला, तेथेच होणार RCB चे सामने; कडक अटी लागू





















