Gautam Gambhir Warn Harshit Rana : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तरुण वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याने आपल्या भेदक कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 9 धावांनी पराभव केला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि हर्षित राणा यांनी अंतिम सामन्यात शानदार कामगिरी केली. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात हर्षित राणाने आपल्या गोलंदाजीने संघाला निराश केले होते. त्यानंतर, त्याच्या प्रशिक्षकाने उघड केल्याप्रमाणे, तो प्रचंड दबावाखाली होता. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याला थेट संदेश दिला की, परफॉर्म कर, नाहीतर बाहेर बसवीन. गौतमचा हा केवळ अल्टिमेटम नव्हता, तर राणासाठी मोठा प्रेरणास्त्रोत ठरला.

Continues below advertisement

सोशल मीडियावरील टीकेला कामगिरीतून उत्तर

राणाच्या निवडीवर बरीच टीका झाली होती. काहींनी तर म्हटलं की, त्याची निवड ही गौतम गंभीर यांच्या पसंतीमुळे झाली आहे, अर्शदीप सिंगच्या तुलनेत तो योग्य नाही. पण हर्षितने यावर भाष्य न करता शांत राहण्याचा मार्ग निवडला. त्याने टीकेला प्रेरणेत रूपांतरित केलं आणि मैदानावर आपल्या खेळातून सर्वांना प्रत्युत्तर दिलं.

Continues below advertisement

करिअरमधील सर्वोत्तम गोलंदाजी

सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये हर्षित राणाने आपल्या करिअरमधील सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने अ‍ॅलेक्स केरी, मिचेल ओवेन, कूपर कॉनॉली आणि जोश हेजलवूड यांना आऊट करत 4 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये विशेषतः वेग, अचूकता आणि विविधतेचा सुरेख संगम दिसला. प्रत्येक चेंडूवर त्याचा आत्मविश्वास झळकत होता. या कामगिरीने त्याने केवळ स्वतःची किंमत सिद्ध केली नाही, तर संघाचा विश्वासही वाढवला.

हर्षित राणाने कबूल केलं की ही यशस्वी कामगिरी केवळ त्याच्या मेहनतीमुळे नव्हे, तर संपूर्ण संघाच्या पाठिंब्यामुळे शक्य झाली. कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी आखलेल्या रणनीतीचा त्याला मोठा फायदा झाला. तसेच कोच गौतम गंभीर यांनी त्याला फक्त तांत्रिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही सक्षम बनवलं. एकंदरीत, हर्षित राणाचा सिडनीतील हा परफॉर्मन्स हे केवळ एका खेळाडूचं यश नव्हे, तर चिकाटी, विश्वास आणि मार्गदर्शनाच्या योग्य संगमाचं उत्तम उदाहरण ठरलं आहे.

हे ही वाचा - 

Women’s World Cup 2025 : इंदूरमध्ये विकृताकडून ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा विनयभंग, देशाची मान खालावणाऱ्या घटनेवर बीसीसीआय म्हणाली...