Gautam Gambhir reply to MS Dhoni Instagram Post : भारताने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा (Ind vs NZ Final) 96 धावांनी पराभव करून तिसरा टी-20 विश्वचषक विजेतेपद पटकावला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 255 धावा केल्या, त्यानंतर न्यूझीलंड 159 धावांत गारद झाला. या विजयानंतर जवळपास दोन वर्षांनंतर महान क्रिकेटपटू MS धोनीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पोस्टमध्ये त्याने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचे कौतुक केले. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

गौतम गंभीरबद्दल MS धोनी काय म्हणाला? (MS Dhoni On Gautam Gambhir)

टीम इंडियाचा अभिनंदन करताना MS धोनी म्हणाला की, अहमदाबादमध्ये इतिहास रचला गेला आहे. भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्हा सगळ्यांना खेळताना पाहणे खरोखरच आनंद झाला.

Continues below advertisement

गौतम गंभीरबद्दल बोलताना धोनी म्हणाला, कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित खूप छान आहे. स्मितहास्यासोबत असलेली ती प्रखरता म्हणजे खरोखरच जबरदस्त कॉम्बिनेशन! खूप छान कामगिरी. मजा करा, हा क्षण एन्जॉय करा…आणि बुमराहबद्दल काही लिहिलं नाही तरच बरं. चॅम्पियन गोलंदाज!”

धोनीच्या या पोस्टवर गौतम गंभीर यानेही लगेच प्रतिक्रिया दिली. त्याने उत्तर देताना लिहिले, “आणि हसण्याचं इतकं सुंदर कारणही आहे. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला.” 

भारताचा डाव कसा राहिला? (Ind vs NZ Final T20 World Cup 2026)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या या सामन्यात भारतानं 20 षटकांत पाच बाद 255 धावांची मजल मारली. सलामीच्या संजू सॅमसननं सलग तिसऱ्या सामन्यात झळकावलेलं वेगवान अर्धशतक भारताच्या या डावाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. त्यानं 46 चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांसह 89 धावांची खेळी उभारली. संजू सॅमसननं अभिषेक शर्माच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी 98 धावांची आणि ईशान किशनच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी रचली. भारताच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी करून न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या चिंधड्या उडवल्या. त्यामुळंच भारतीय डावाच्या आठव्या षटकात शतक आणि 15व्या षटकात द्विशतक धावफलकावर लागलं. पण जेम्स नीशामनं 16व्या षटकांत तीन फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या डावाला ब्रेक लावला. त्याआधी, अभिषेक शर्मानं 21 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 52 धावांची, तर ईशान किशननं 25 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह 54 धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी मोठे फटके खेळून भारताला पाच बाद 255 धावांचा पल्ला गाठून दिला.

न्यूझीलंडचा डाव कसा राहिला? (Ind vs NZ Final T20 World Cup 2026)

256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अ‍ॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कीवी संघाची घसरण सुरू झाली. न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. डॅरिल मिचेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 35 चेंडूत 43 धावांची झुंज दिली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.

हे ही वाचा -

Shoaib Akhtar On Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : 2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video