IND vs ENG, 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीचा थरारक शेवट झाला. पाचव्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारताने दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवलं. या सामन्यात एक अनपेक्षित प्रसंग घडला, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने शेवटच्या सत्रात रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना हात मिळवून सामना ड्रॉ करण्याचा संकेत दिला. मात्र, दोन्ही फलंदाजांनी त्यास स्पष्ट नकार दिला आणि फलंदाजी सुरूच ठेवत आपापले शतकं पूर्ण केली. या घटनेने सोशल मीडियावर वाद पेटला आहे.
गंभीरचा संताप, सांगण्यासारखं काही उरलेलंच नाही"
या घटनेवर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या मुख्य प्रशिक्षक असलेले गौतम गंभीर यांनी रोष व्यक्त केला आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत जेव्हा यावर त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी इंग्लंडच्या वृत्तीवर जोरदार टीका केली. गंभीर म्हणाला की, "जर इंग्लंडचा कोणी फलंदाज 90 किंवा 85 धावांवर असता, तर काय त्यांनीही सामना ड्रॉ केला असता? नाही ना. मग आमच्याकडील खेळाडू शतकाच्या जवळ आहेत, तर त्यांना का थांबवावं? जर अशा प्रकारे वागायचं असेल, तर माझ्याकडे सांगण्यासारखं काही उरलेलंच नाही." गंभीर यांनी स्पष्ट केलं की, सुंदर आणि जडेजा दोघंही त्यांच्या खेळीमुळे शतकाचे पात्र होते, आणि त्यांनी ते मिळवूनही दाखवलं.
वॉशिंग्टन सुंदरचं पहिलं कसोटी शतक
वॉशिंग्टन सुंदरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक याच सामन्यात ठोकलं. त्याने 206 चेंडूंमध्ये 101 धावा केल्या. त्यांच्यासोबत रवींद्र जडेजाने देखील जबरदस्त खेळी करत 185 चेंडूंमध्ये 107 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळेच भारताने अशक्य वाटणारा सामना वाचवला.
पराभवाच्या उंबरठ्यावरून विजयासमान ड्रॉ
या सामन्याच्या एका टप्प्यावर भारताची स्थिती अतिशय नाजूक होती. पण के.एल. राहुल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांनी संयम आणि लढवय्या वृत्ती दाखवत इंग्लंडला पराभवाचं स्वप्न दाखवून सामना ड्रॉ केला. ही केवळ ड्रॉ नव्हे, तर एक जबरदस्त मानसिक विजय होता.
हे ही वाचा -