West Indies Cricketer News: वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज टिनो बेस्ट (Tino Best) सध्या चर्चेत आला आहे. टिनो बेस्टने त्याच्या आत्मचरित्राच्या पुस्तकांत एक खुलासा केल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. टिनो बेस्टने त्याच्या 'माइंड द विंडोज-माय स्टोरी' या आत्मचरित्रात त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. 

टिनो बेस्टने आत्मचरित्राच्या पुस्तकात म्हटले की, माझे पहिले प्रेम मेलिसा नावाच्या तरुणीसोबत होते. पण नंतर तिच्याशी चांगले संबंध राहिले नाहीत आणि आम्ही दोघेही वेगळे झालो. मेलिसापासून वेगळे झाल्यानंतर टिनो बेस्टने स्वतःला प्लेबॉय बनवले होते. टिनो बेस्टने पुस्तकात असेही म्हटले आहे की त्याचे 500 हून अधिक महिलांसोबत शारीरिक संबंध होते. म्हणूनच तो स्वतःला 'ब्लॅक ब्रॅड पिट' म्हणायचा. टिनो बेस्टने त्याच्या पुस्तकात असेही लिहिले आहे की, त्याने स्वतःला प्लेबॉय बनवले असले तरी त्याचा त्याच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ दिला नाही. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी खूप मेहनत करत होता. 

जगातील सर्वात सुंदर मुली ऑस्ट्रेलियाच्या- टिनो बेस्ट 

टिनो बेस्टने या पुस्तकांत खुलासा केला आहे की, ऑस्ट्रेलियन महिला त्याला सर्वांत जास्त आवडतात. ऑस्ट्रेलियन महिला सर्वात जास्त आवडतात. त्याने जगभरातील महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले. परंतु त्याला ऑस्ट्रेलियन महिला सर्वात सुंदर वाटल्या. जगातील सर्वात सुंदर मुली ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्या अद्भुत आहेत आणि फिटनेसकडे खूप लक्ष देतात, असं टिनो बेस्टने म्हटलं आहे. 

टिनो बेस्टची कारकीर्द-

टिनो बेस्ट वेस्ट इंडिज संघासाठी 2003 ते 2014 या काळात खेळला.

कसोटी क्रिकेटमधील सामन्यांतील कामगिरी:

एकूण सामने: 25

विकेट्स: 57

सर्वोत्तम गोलंदाजी: 6/40

सरासरी: 40.19

एकदिवसीय क्रिकेटमधील सामन्यांतील कामगिरी:

एकूण सामने: 26

विकेट्स: 34

सर्वोत्तम: 4/35

टी-20 क्रिकेटमधील सामन्यांतील कामगिरी:

सामने: 6

विकेट्स: 

सरासरी: 25.67

विशेष कामगिरी:

इंग्लंडविरुद्ध 2012 मध्ये 11 व्या क्रमांकावर फलंदाज म्हणून 95 धावांची खेळी करून त्याने जागतिक क्रिकेटमध्ये विशेष नोंद केली होती.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Aus vs SA WTC Final 2025: ऑस्ट्रेलिया अन् द. अफ्रिकेत आजपासून WTC चा अंतिम सामना रंगणार; दोन्ही संघांनी जाहीर केली तगडी Playing XI