विश्वचषकाच्या फायनलआधी भारतीय क्रिकेट विश्वात शोककळा; भीषण अपघातामध्ये माजी क्रिकेटपटूचा मृत्यू
भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक सामन्याच्या आधीच भारतीय क्रिकेटविश्वातून एक दुख:त बातमी समोर आली आहे.

Former India U19 Cricketer Rajesh Banik Dies : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ पहिल्यांदाच महिला वनडे वर्ल्ड कपचं (ICC Women's World Cup Final 2025) विजेतेपद जिंकण्यासाठी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. पण या ऐतिहासिक सामन्याच्या आधीच भारतीय क्रिकेटविश्वातून एक दुख:त बातमी समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू राजेश बानिक यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे.
भीषण अपघातामध्ये माजी क्रिकेटपटूचा मृत्यू (Former India U19 Cricketer Rajesh Banik Dies)
राजेश बानिक हा भारतीय अंडर-19 संघाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू होता आणि त्याचे वय फक्त 40 वर्षे होते. त्याचा मृत्यू पश्चिम त्रिपुरातील आनंदनगर येथे झाल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट क्षेत्रात शोककळा पसरली आहे. राजेश बानिक हा इरफान पठाण आणि अंबाती रायुडू यांच्यासोबतही खेळला होता.
त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनकडून शोक व्यक्त
त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुब्रता डे यांनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं की, “आम्ही एक प्रतिभावान क्रिकेटपटू आणि अंडर-16 संघाचा निवडकर्ता गमावला आहेत. हे अत्यंत दु:खद आहे. भगवान त्याच्या आत्म्यास शांती देवो.” मिळालेल्या माहितीनुसार, राजेश बानिक याचा भीषण रोड अपघात झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अगरतला येथील जीबीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना वाचवू शकले नाही.
राजेश बानिक याची कामगिरी
राजेश बानिक याने त्रिपुरासाठी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना उत्तम कामगिरी केली होती. त्याने 42 प्रथम श्रेणी सामने खेळत 1469 धावा केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय, 24 लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याने 378 धावा आणि 8 विकेट्स, तर 18 टी-20 सामन्यांत 203 धावा केल्या. त्याचा शेवटचा रणजी सामना 2018 मध्ये ओडिशाविरुद्ध झाला होता.
त्रिपुरातील क्रिकेट विश्वात बानिक हा फक्त उत्कृष्ट ऑलराउंडर नव्हता, तर तरुण प्रतिभांचा शोध घेण्यातही निपुण होता. म्हणूनच त्याला राज्याच्या अंडर-16 संघाचे निवडकर्ता बनवण्यात आलं होतं. त्याच्या अचानक जाण्याने त्रिपुरा क्रिकेटला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
🚨 BREAKING 🚨
— Chiku 👑 (@mrsnowwhite1000) November 2, 2025
Former India U-19 and Tripura all-rounder Rajesh Banik dies in a road accident at Anandanagar, West Tripura.
Sending Prayers To Friends And Family 🙏 pic.twitter.com/SHTaNXow3s
हे ही वाचा
















