Virender Sehwag Brother : भारताचा माजी विस्फोटक सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) भावाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. वीरेंद्र सेहवागचा भाऊ विनोद सेहवाग (virender sehwag brother Vinod Sehwag) याच्याविरोधात चंदीगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सेहवाग याच्याशिवाय अन्य दोघांविरोधात पोलिसांनी भादवि 174 ए आणि 82 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. विनोद सेहवाग, सुधीर मल्होत्रा आणि विष्णु मित्तल अशी आरोपांची नावे आहेत. विनोद सेहवाग याच्याविरोधात चेक बाऊन्स प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय या प्रकरणात हराकिरी करणाऱ्या एसएचओ याच्याही अडचणी वाढल्या आहेत. (Crime News Update)
विनोद सेहवाग, सुधीर मल्होत्रा आणि विष्णु मित्तल यांच्याविरोधात मनीमाजरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेक बाऊन्सप्रकरणी भादवि कलम 174-A, आणि 82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
वीरेंद्र सेहवागचा भाऊ विनोद सेहवाग याची बहादुरगढजवळ रोहतकमध्ये फॅक्ट्री आहे. जाल्टा फूड एंड बिवरेजिस फॅक्ट्री असे नाव आहे. येथे प्लॅस्टिकच्या बोटलमध्ये जलजीरा, कोल्ड ड्रिंक्स भरण्याचे काम होते. मिळालेल्या माहितीनुसार, जाल्टा फूड एंड बिवरेजिस फॅक्ट्रीमध्ये सुधीर मल्होत्रा आणि विष्णु मित्तल हे बिजनेस पार्टनर आहेत. यांची फॅक्ट्री बद्दी येथील नैना प्लास्टिक फॅक्ट्रीमधून बॉटल खरेदी करते. विनोद सेहवागच्या कंपनीने खरेदी केल्यानंतर नैना प्लास्टिक कंपनीला एक चेक दिला होता. हा चेक बँकमध्ये टाकल्यानंतर तो बाऊन्स झाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
कोर्टाने फरार केले घोषित -
विनोद सेहवाग यांच्या फॅक्ट्रीचा चेक बाऊन्स झाल्यानंतर तक्रारकर्त्यांनी कोर्टाचे दार ठोठावले. त्यांनी जाल्टा फूड कंपनीच्या संचलकांच्या विरोधात चेक बाऊन्स प्रकरणी गुन्हा दाखल केला. कोर्टाने त्या सर्वांना फरार घोषित केले.
पंचकूला येथील सेक्टर 12 येथे राहणाऱ्या कृष्ण मोहन यांनी निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स (एनआई) अधिनियमच्या 138 नुसार कोर्टात तक्रार दाखल केली होती.