England vs Pakistan 1st Test Update : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली. लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हा निर्णय पहिल्याच चेंडूवर योग्य ठरला. पाकिस्तानच्या डावातील पहिल्याच चेंडूवर सलामीवीर अझान ओवैसला पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने अप्रतिम चेंडू टाकत अझान ओवैसला पायचीत केले. त्यामुळे पाकिस्तानने पहिल्याच चेंडूवर आपली पहिली विकेट गमावली आणि संघाची अवस्था 2 धावांवर 1 विकेट अशी झाली. 

Continues below advertisement

Continues below advertisement

रिव्ह्यू घेतला, पण वाया गेला (Azan Awais lbw Ollie Robinson Eng vs Pak 1st Test)

ओली रॉबिन्सनचा हा चेंडू सीमवर पडून आतल्या बाजूला वेगाने वळला. चेंडूला अपेक्षेप्रमाणे उंची मिळाली नाही, मात्र त्याने अचानक आतमध्ये घेतलेला टर्न अझान ओवैससाठी घातक ठरला. अझान ओवैसने चेंडूचा अंदाज घेण्यात चूक केली आणि त्याचा फलंदाजीचा फटका चुकवत चेंडू थेट ऑफ स्टम्पसमोर त्याच्या पॅडवर जाऊन आदळला. इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले आणि मैदानावरील पंचांनी अवेसला बाद घोषित केले. 

पाकिस्तानने तातडीने रिव्ह्यू घेतला, मात्र रिप्लेमध्येही पंचांचा निर्णय कायम राहिला. त्यामुळे पाकिस्तानचा रिव्ह्यूही वाया गेला. ओवैसला आपल्या डावातील पहिल्याच चेंडूवर खाते न उघडताच माघारी परतावे लागले. त्याची आकडेवारी 1 चेंडू, 0 धावा अशी राहिली. दुसरीकडे ओली रॉबिन्सनने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत आपल्या संघाला स्वप्नवत सुरुवात करून दिली.

पाकिस्तानला धक्क्यावर धक्के (Shan Masood lbw b Ollie Robinson Eng vs Pak 1st Test)

ओली रॉबिन्सनने अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानला अजून एक मोठा धक्का दिला. अझान ओवैसनंतर त्याने शान मसूदला एलबीडब्ल्यू बाद केले. शान मसूदला 20 चेंडूंमध्ये अवघ्या 5 धावांवर माघारी परतावे लागले. बातमी लिहिपर्यंत संघाची अवस्था 5 षटकात 7 धावांवर 2 विकेट अशी झाली.

पाकिस्तान संघाची प्लेइंग-11 : अझान अवेस, इमाम-उल-हक, शान मसूद, अब्दुल्ला शफीक, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान आगा (कर्णधार), अली उस्मान, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली, मोहम्मद अब्बास.

इंग्लंड संघाची प्लेइंग-11 : बेन डकेट, एमिलियो गे, जॉर्डन कॉक्स, जो रूट(कर्णधार), हॅरी ब्रूक, डॅन लॉरेन्स, जेमी स्मिथ, ऑली रॉबिन्सन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, जोश टंग

हे ही वाचा -

Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं