एक्स्प्लोर

IND VS ENG 5th T20 : भारत-इंग्लंड शेवटच्या अन् पाचव्या टी-20 मॅचची वेळ बदलली; रात्री 10 वाजता नाही, तर... कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या A टू Z

England vs India 5th T20I Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

England vs India 5th T20I Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ब्रिस्टल येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारतावर 9 विकेट्सने सहज विजय मिळवत मालिका 3-0 अशी आपल्या नावावर केली. आता मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना भारतासाठी प्रतिष्ठेचा ठरणार असून, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ विजयासह मालिकेचा शेवट गोड करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

पाचवा टी-20 सामना कधी खेळवला जाणार? (ENG vs IND 5th T20I)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी-20 सामना 11 जुलै (शनिवार) रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथील द रोज बाउल स्टेडियमवर रंगणार असून, मालिकेतील अखेरच्या लढतीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

पुन्हा बदलली सामन्याची वेळ

या मालिकेतील सामन्यांच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होणार असल्याची माहिती होती. मात्र आता हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. तर दोन्ही संघांचे कर्णधार संध्याकाळी 6.30 वाजता नाणेफेकीसाठी मैदानात येतील. 

इंग्लंडने मालिका आधीच खिशात घातली

पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर मँचेस्टरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 4 विकेट्सने विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात नॉटिंगहॅम येथे भारताला तब्बल 125 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ब्रिस्टलमध्ये झालेल्या चौथ्या सामन्यात इंग्लंडने 9 विकेट्सने सहज विजय मिळवत मालिका 3-0 अशी जिंकली. त्यामुळे अखेरचा सामना केवळ प्रतिष्ठेचा राहिला आहे.

लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. Sony Sports 3 वर हिंदी समालोचनासह सामना पाहता येईल. Sony Sports 5 वर इंग्रजी समालोचन उपलब्ध असेल. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. याशिवाय DD Sports 1.0 वर फ्री डिश वापरणाऱ्या प्रेक्षकांनाही या सामन्याचा मोफत आनंद घेता येणार आहे. भारतीय संघ मालिका गमावून बसला असला, तरी अखेरच्या सामन्यात विजय मिळवत इंग्लंड दौऱ्याचा शेवट सकारात्मक करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे साउथॅम्प्टनमध्ये रंगणाऱ्या या लढतीकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

भारतीय क्रिकेट संघ : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, सूर्यांश शेडगे.

इंग्लंड क्रिकेट संघ : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम कुरन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, आदिल रशीद, जोश टोंगे, सोनी बेकर, रेहान अहमद, जॉर्डन कॉक्स, साकिब महमूद, ल्यूक वुड.

हे ही वाचा -

एकीकडे पराभव... दुसरीकडे ऑलिम्पिकचं तिकीट धोक्यात! सलग पराभवांनी टीम इंडियाची वाढवली धाकधूक; पाकिस्तान मारणार मोठी बाजी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Embed widget