Highest ODI Score : डेविड मलान, जोस बटलर आणि फिल साल्ट यांच्या वादळी शतकाच्या बळावर इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केलाय. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 498 धावांचा डोंगर उभारलाय. नेटरलँड संघाला विजयासाठी तब्बल 499 धावांचे आव्हान दिलेय. 


नेदरलँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जेसन रॉय अवघ्या एका धावेंवर माघारी परतला. पहिली विकेट झटपट पडल्यानंतर डेविड मलान आणि फिल साल्ट यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी द्विशतकी भागिदारी केली. दोघांनी तब्बल 223 धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. फिल साल्ट याने 122 धावांची खेळी केली. तर डेविड मलान याने 125 धावांची वादळी खेळी केली.


 






जोस बटलरची वादळी खेळी - 
आयपीएलमध्ये तुफानी खेळी करणाऱ्या जोस बटलरने नेदरलँडच्या गोलंदाजांची पिटाई केली. बटलरने अवघ्या 70 चेंडूत 162 धावांचा पाऊस पाडला. या खेळीरम्यान बटलरने तब्बल 14 षटकार आणि सात चौकार लगावले. बटलरशिवाय फिल साल्ट याने 93 चेंडूत 122 तर डेविड मलान याने 109 चेंडूत 125 धावांची खेळी केली. 


लियाम लिव्हिंगस्टोनचं तुफान - 
आयपीएलमध्ये षटकार चौकारांचा पाऊस पाडणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोन यानेही षटकारांचा पाऊस पाडला. लियाम लिव्हिंगस्टोन याने फक्त 22 चेंडूत 66 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान लियामने सहा चौकार आणि सहा षटकारांचा पाऊस पाडला. 


चौकार-षटकारांचा पाऊस 
इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. 50 षटकात तब्बल 26 षटकार आणि 36 चौकारांचा पाऊस पाडला. सर्वाधिक षटकार जोस बटलरने लगावले. बटलरने तब्बल 14 षटकारांचा पाऊस पाडला. बटलरने 70 चेंडूत 162 तर लियामने 22 चेंडूत 66 धावांचा पाऊस पाडला. 


नेदरलँडची कमकुवत गोलंदाजी - 
नेदरलँडच्या एकाही गोलंदाजाला अचूक टप्प्यावर मारा करता आला नाही. प्रत्येक गोलंदाजाला प्रतिषटक आठ पेक्षा जास्त धावांनी चोप मिळाला. नेदरलँडकडून पिटर सीलार याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. पण त्यासाठी त्याने 9 षटकात 83 धावा खर्च केल्या. नेदरलँडच्या Philippe Boissevain याच्या गोलंदाजीत तर धावांचा पाऊसच पडला. Philippe Boissevain याने 10 षटकांत तब्बल 108 धावा दिल्या.