एक्स्प्लोर

ENG vs NEP : नेपाळने शेवटपर्यंत इंग्रजांना नाचवलं, 6 चेंडूत हव्या होत्या 10 धावा, टी-20 वर्ल्ड कपचा सर्वात धक्कादायक उलटफेर टळला

ENG vs NEP T20 World Cup 2026 : इंग्लंड संघाचा कसाबसा विजय, नेपालचा अवघ्या 4 धावांनी पराभव

England beat Nepal T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकप 2026 मधील पाचव्या सामन्यात मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड आणि नेपाल आमनेसामने होते. या सामन्यात मोठा उलटफेर होण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण अखेर इंग्लंडने अनुभवाच्या जोरावर सामना आपल्या बाजूने वळवला आणि अवघ्या 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला. सामन्याच्या एका टप्प्यावर नेपाल सहजपणे इंग्लंडला पराभूत करेल असे चित्र दिसत होते. मात्र, निर्णायक क्षणी इंग्लिश खेळाडूंनी जबरदस्त पुनरागमन करत सामन्यावर पकड मिळवली.

सॅम करण ठरला इंग्लंडचा हिरो

सामन्याच्या शेवटच्या षटकात नेपालला विजयासाठी 10 धावा हव्या होत्या. त्या निर्णायक क्षणी सॅम करणने अचूक यॉर्कर टाकत केवळ 5 धावा दिल्या आणि इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या कामगिरीमुळे सॅम करण सामन्याचा खरा हिरो ठरला.

नेपालच्या झुंजार खेळीला अपयशाची किनार 

नेपालकडून दीपेंद्रसिंह ऐरी आणि लोकश बाम यांनी झुंजार फलंदाजी केली, मात्र त्यांची मेहनत अपुरी ठरली. दीपेंद्रसिंहने 29 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 44 धावा केल्या. तर आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लोकश बामने 20 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 39 धावांची तडाखेबंद खेळी साकारली.

इंग्लंडची दमदार फलंदाजी

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 184/7 धावा फलकावर लावल्या. जेकब बेथेल याने 35 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 55 धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार हॅरी ब्रूक याने 32 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 53 धावा करत संघाला मजबूत पाया दिला.

184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपालचा संघ 20 षटकांत 180/6 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विजय अगदी हातात असतानाच संघाला केवळ 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडकडून गोलंदाजीत लियाम डॉसनने 2 विकेट्स घेतल्या, तर ल्यूक वूड, जोफ्रा आर्चर, विल जॅक्स आणि सॅम कर्रन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

हे ही वाचा -

Nepali vs Eng T20 World Cup 2026 : डोळ्यांवर विश्वास बसेना! करिअरच्या पहिल्याच चेंडूवर नेपाळच्या पठ्ठ्याने रचला इतिहास, टी-20 वर्ल्डकपमध्ये नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग OUT, मोहम्मद सिराज IN...; इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
अभिषेक, अर्शदीप OUT, मोहम्मद सिराज IN...; इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी अशी असेल भारताची Playing XI
Sanju Samson : कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला, ICC कडून व्हिडीओ शेअर
कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला
IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल
इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
Iran Israel War : इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी आणि इतर प्रकरणात दिलासा, पोस्ट करत म्हणाले, आपल्याला न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका...
आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक व अविचारी कृतीमुळं आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या बळ मिळतं, संयम महत्त्वाचा: धनंजय मुंडे 
EPFO : ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, 1000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात येणार
ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, खात्यात 1000 रुपयांपर्यंत रक्कम येणार
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
Embed widget