India VS England 1st ODI Playing XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज (14 जुलै) बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी यजमान इंग्लंडने आपल्या अंतिम प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली असून, काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे युवा अष्टपैलू जेकब बेथेलला सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर सुरुवातीपासूनच वेगळं आव्हान असणार आहे. याशिवाय, अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरसाठी हा सामना अत्यंत खास ठरणार आहे. तो आपल्या कारकिर्दीतील 200 वा एकदिवसीय सामना खेळणार असून, या ऐतिहासिक टप्प्यावर मोठी खेळी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

Continues below advertisement

जेकब बेथेलला सलामीची संधी

इंग्लंडने बेन डकेटसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी युवा फलंदाज जेकब बेथेलवर विश्वास दाखवला आहे. आतापर्यंत 21 वनडे सामने खेळलेल्या बेथेलला प्रथमच अशा महत्त्वाच्या भूमिकेत संधी मिळत आहे. इंग्लंडला डकेटसाठी स्थिर सलामीवीर शोधायचा असून, बेथेल त्या भूमिकेत कितपत यशस्वी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात डकेटचा हा पाचवा वेगळा सलामीचा जोडीदार असेल. याआधी फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, जॅक क्रॉली आणि रेहान अहमद यांनी ही भूमिका निभावली होती.

Continues below advertisement

भारताच्या स्टार फलंदाजांसाठी खास रणनीती

कर्णधार हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने भारताच्या मजबूत फलंदाजीला रोखण्यासाठी स्पिनवर भर दिला आहे. संघात विल जॅक्स, लियाम डॉसन आणि आदिल रशीद या तीन फिरकीपटूंना स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजांना रोखण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे.

जोस बटलरचा 200 वा वनडे, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन

जोस बटलरसाठी हा सामना संस्मरणीय ठरणार आहे. त्याने 21 फेब्रुवारी 2012 रोजी पाकिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 199 वनडे सामन्यांत 11 शतके आणि 29 अर्धशतकांच्या मदतीने 5,515 धावा केल्या आहेत. 200 व्या सामन्यात मोठी खेळी करून हा टप्पा संस्मरणीय करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. तसेच, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे इंग्लंडच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे. नोव्हेंबरनंतर तो पुन्हा वनडे संघात खेळताना दिसणार आहे. त्याच्यासोबत जोश टंग वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. मात्र, गस अॅटकिन्सनला अंतिम संघात स्थान मिळालेले नाही.

इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन : जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टंग आणि आदिल रशीद.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव

IND vs ENG ODI मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

14 जुलै 2026 : पहिला ODI, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम (3:30 दुपारी)16 जुलै 2026 : दुसरी वनडे, सोफिया गार्डन्स, कार्डिफ (5:30 संध्याकाळी)19 जुलै 2026 : तिसरा एकदिवसीय, लॉर्ड्स, लंडन (3:30 संध्याकाळी)

हे ही वाचा -

Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप