लीडस : इंग्लंडनं पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. लीडसमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडनं पाकिस्तानचा एक डाव आणि 103 धावांनी पराभव केला आहे. पाकिस्तानचा सलग दुसऱ्यांदा लीडसच्या मैदानावर एका डावानं पराभव झाला आहे. यापूर्वी 2018 मध्ये इंग्लंडनं पाकिस्तानला एक डाव आणि 55 धावांनी पराभूत केलं होतं.  

Continues below advertisement

पाकिस्तानचा संघ लीडस कसोटीत दुसऱ्या डावात 135 धावांवर बाद झाला. यावरुन पाकिस्तानच्या फलंदाजांची कामगिरी किती खराब होती हे दिसून आलं. केवळ तीन दिवसांच्या कसोटीत पाकिस्तानवर दोन्ही डावात बाद होण्याची नामुष्की ओढावली. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात मोहम्मद रिझवान यानं सर्वाधिक 41 धावा केल्या. तर, ओली रॉबिन्सन आणि जोश टंग सर्वात यशस्वी फलंदाज ठरले. 

दुसऱ्या डावात पाकच्या 135 धावा

लीडस कसोटीत पाकिस्तानच्या फलंदाजांची कामगिरी खूप निराशाजनक दिसून आली. दोन्ही डावात पाकिस्तानचे खेळाडू संघर्ष करताना दिसून आले.  दुसऱ्या डावात पाकिस्तानचे 7 फलंदाज दोन अंकी धावा म्हणजे 10  धावा देखील करु शकले नाहीत. दुसऱ्या डावात पाकिस्तानला दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. जोफ्रा आर्चरनं पाकला पहिला धक्का दिला. पाकचा दुसरा सलामीवीर अजान अवैस 9 धावा करुन बाद झाला. जोफ्रा आर्चरनं त्याची विकेट घेतली. पाककडून पहिल्या डावात करणारा अब्दुल्ला शरफीक दुसऱ्या डावात 15 धावा करु शकला. सऊद शकील यानं 14 धावा, शान मसूद यानं 29 धावा केल्या. कॅप्टन सलमान अली आगा 4 धावा करुन बाद झाला. अली उस्मान यानं  7 धावा केल्या तर खुर्रम शहजाद यानं 8 धावा केल्या. 

Continues below advertisement

पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ 171 धावांवर बाद झाला होता. इंग्लंडकडून  जोश टंग आणि ओली रॉबिन्सन यांनी पाच पाच विकेट घेतल्या.  इंग्लंडनं पहिल्या डावात 409 धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडला 238 धावांची आघाडी मिळाली होती.  पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात 135 धावांवर बाद झाला. यामुळं पाकचा एक डाव आणि 103 धावांनी पराभव झाला.