South Zone squad for Duleep Trophy Confirmed : झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधारपद भूषवल्यानंतर युवा फलंदाज तिलक वर्मा याच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेसाठी साउथ झोनच्या (South Zone) कर्णधारपदी तिलक वर्माची निवड करण्यात आली आहे. त्याच्यासोबत आंध्र प्रदेशच्या अनुभवी रिकी भुई याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघाबाहेर असलेला आणि कसोटीत भारतासाठी त्रिशतक झळकवणारा फलंदाज करूण नायर यालाही या संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय भारताचा उगवता फलंदाज एस. के. रशीद याचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

कर्नाटकचा आर. स्मरन आणि हैदराबादचा के. हिमतेजा यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. इंडिया अ संघाचा माजी यष्टीरक्षक एन. जगदीसन यांचाही संघात समावेश आहे. याव्यतिरिक्त, श्रेयस गोपाल आणि के. साई तेजा यांसारख्या खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

दुलीप ट्रॉफी कधी सुरू होणार?

भारतीय क्रिकेटचा 2026-27 चा देशांतर्गत हंगाम दुलीप ट्रॉफीने सुरू होत आहे. दुलीप ट्रॉफीचे सामने 23 ऑगस्टपासून सुरू होतील आणि 10 सप्टेंबरपर्यंत चालतील. यावर्षी दुलीप ट्रॉफीमध्ये सुधारणा करून तिच्या जागी जुने विभागीय स्वरूप आणले गेले असून, त्यात एकूण सहा संघ सहभागी झाले आहेत. सर्व सामने बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर खेळले जातील.

दुलीप ट्रॉफी साठी साउथ झोन स्क्वाड :

तिलक वर्मा (कर्णधार), रिकी भुई (उपकर्णधार), अभिनव तेजराना, एसके रशीद, के हिमतेजा, आर स्मरण, एन जगदीसन, करुण नायर, टी त्यागराजन, श्रेयस गोपाल, के साई तेजा, टी विजय, व्ही कवीरप्पा आणि अमन खान.

दुलीप ट्रॉफी साठी ईस्ट झोन स्क्वाड :

इशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, सुदीप कुमार घारामी, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, शाहबाज अहमद, सूरज सिंधू जैस्वाल, विजय सिंह, कुमार कुशाग्र, शिखर मोहन, शुभांशु सेनापती, अभिजित सरकार, अनुकुल रॉय, दानिश दास.

दुलीप ट्रॉफी साठी वेस्ट झोन स्क्वाड :

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शम्स मुलाणी (उपकर्णधार), हार्विक देसाई, उर्विल पटेल, जयमीत पटेल, पृथ्वी शॉ, शिवालिक शर्मा, सिद्धार्थ देसाई, सरफराज खान, मुशीर खान, अतित शेठ, मुकेश चौधरी, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे.

दुलीप ट्रॉफी साठी सेंट्रल झोन स्क्वाड :

रजत पाटीदार (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), अमन मोखाडे, कोनील चंडेला, यश राठोड, आयुष पांडे, आर्यन जुयाल, कोनिल सिंग राठोड, सरांश जैन, हर्ष दुबे, अर्शद खान, जीशान अन्सारी, आर्यन पांडे, यश ठाकूर, निकेत भुते.

हे ही वाचा -

Rajat Patidar News : RCB ला चॅम्पियन बनवल्यावर पाटीदारचा नवा धमाका! आता 'या' बलाढ्य संघाची कमान हातात, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद