एक्स्प्लोर

Sourav Ganguly on Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियात एन्ट्री होताच वैभवला दादाचा थेट इशारा; गांगुलीचे शब्द ऐकून सगळेच चक्रावले, नेमकं काय काय म्हणाला?

Sourav Ganguly on Vaibhav Sooryavanshi : वय फक्त 15 वर्षे. पण नाव संपूर्ण क्रिकेटविश्वात गाजत आहे. आयपीएलमधील धडाकेबाज कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशी याचे टीम इंडियात निवड होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Sourav Ganguly on Vaibhav Sooryavanshi : वय फक्त 15 वर्षे... पण नाव संपूर्ण क्रिकेटविश्वात गाजत आहे. आयपीएलमधील धडाकेबाज कामगिरीनंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याचे टीम इंडियात निवड होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आयर्लंड, इंग्लंड दौरा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी त्याला वास्तवाची जाणीव करून देणारा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. गांगुलींच्या मते, आयपीएलमध्ये यश मिळवणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने चमकणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे वैभवकडून लगेचच चमत्काराची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही.

"इंग्लंड-आयर्लंडमध्ये खरी परीक्षा होणार...." - सौरव गांगुली (Sourav Ganguly on Vaibhav Sooryavanshi)

पीटीआयशी बोलताना गांगुली म्हणाले की, इंग्लंड आणि आयर्लंडमधील खेळपट्ट्या भारतीय परिस्थितींपेक्षा खूप वेगळ्या असतात. तिथे चेंडू अधिक स्विंग होतो, सीम मूव्हमेंट मिळते आणि अतिरिक्त उसळीही असते. अशा परिस्थितीत फलंदाजी करणे कोणत्याही युवा खेळाडूसाठी मोठे आव्हान असते. गांगुली म्हणाले, "टीम इंडियासाठी खेळणे वेगळे असते. आता वैभव अशा खेळपट्ट्यांवर खेळणार आहे जिथे चेंडू अधिक सीम आणि स्विंग होईल. नव्या चेंडूविरुद्ध फलंदाजी करणे सोपे नसते. परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. मात्र त्याच्याकडे प्रतिभेची कमतरता नाही."

"15 वर्षांच्या मुलाकडून चमत्काराची अपेक्षा नको..." - सौरव गांगुली (Sourav Ganguly on Vaibhav Sooryavanshi)

'दादा' यांनी चाहत्यांनाही संयम बाळगण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, अवघ्या 15 वर्षांच्या खेळाडूकडून लगेचच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठमोठ्या पराक्रमांची अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. गांगुली म्हणाले की, वैभव अजून शिकण्याच्या प्रक्रियेत आहे. टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. त्याच्यावर अनावश्यक दबाव टाकू नये.

आयर्लंडविरुद्ध मिळू शकते पदार्पणाची संधी

भारतीय संघ 26 आणि 28 जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळणार आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार असून तिथे त्याच्या क्षमतेची खरी कसोटी लागणार आहे. वैभवकडे अफाट प्रतिभा आहे, पण गांगुलींचा संदेश स्पष्ट आहे "घाई करू नका, हा हिरा आहे... पण त्याला चमकण्यासाठी वेळ द्यावा लागेल!"

हे ही वाचा - 

Suryakumar Yadav : टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्समधूनही सूर्यकुमार यादव OUT? सगळ्यांत मोठा पुरावा समोर, दोन संघांमध्ये बोलणी सुरु, नेमकं काय घडतंय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी घेऊनही भारताचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?  
टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी घेऊनही भारताचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?  
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला विजय, शुभमन गिलची दमदार कामगिरी, अक्षर-वॉशिंग्टन ठरले विजयाचे शिल्पकार, वनडे मालिकेत आघाडी
इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला विजय,शुभमन गिल, अक्षर-वॉशिंग्टन ठरले विजयाचे शिल्पकार, वनडे मालिकेत आघाडी
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget