Dinesh Karthik Picks Team India Squad For ODI World Cup 2027: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 (ODI World Cup 2027) दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाने ऑक्टोबर 2027 मध्ये होणार आहे. याचपार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संभाव्य 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. शुभमन गिलला (Shubhman Gill) कर्णधार म्हणून निवडले आहे . या संघात अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये शुभमन गिलसह रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे दिनेश कार्तिकने ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजाला विश्वषचक 2027 च्या संघातून वगळले आहे. (Team India Squad For ODI World Cup 2027)

Continues below advertisement

सलामीसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, तर मधल्या फळीत श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. गोलंदाजी विभागात कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच इंग्लंड दौऱ्यावर विकेटकीपर म्हणून खेळलेल्या ईशान किशनला दिनेश कार्तिकने आपल्या संघात स्थान दिले आहे. तर यशस्वी जैस्वाल, नितीशकुमार रेड्डी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

वनडे विश्वचषक 2027 साठी दिनेश कार्तिकने निवडला टीम इंडियाचा संघ- (Dinesh Karthik Picks Team India Squad For ODI World Cup 2027)

  1. शुभमन गिल
  2. रोहित शर्मा
  3. विराट कोहली
  4. श्रेयस अय्यर
  5. केएल राहुल
  6. यशस्वी जैस्वाल
  7. ईशान किशन
  8. हार्दिक पांड्या
  9. अक्षर पटेल
  10. नितीशकुमार रेड्डी
  11. जसप्रीत बुमराह
  12. भुवनेश्वर कुमार
  13. मोहम्मद सिराज
  14. मोहम्मद शामी
  15. कुलदीप यादव

2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल- (ICC ODI World Cup 2027)

आयसीसीने 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल केला आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये ऑक्टोबर 2027 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 14 संघ सहभागी होणार असून, ‘सुपर-7’ टप्पा जोडण्यात आला आहे. या नवीन रचनेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन फॉरमॅटमध्ये 14 संघांना प्रत्येकी 7 च्या दोन गटात विभागले जाईल. साखळी फेरीत (Group Stage) प्रत्येक संघ 6 सामने खेळेल आणि त्यातून तळाचे दोन संघ बाहेर पडतील. दोन्ही गटांतील अव्वल 3 संघ पुढे 'सुपर-7' टप्प्यात प्रवेश करतील. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल सामने खेळवले जातील. ही स्पर्धा 4 ऑक्टोबर 2027 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Ind vs Pak : पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित