नवी दिल्ली: दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) साठी आयपीएलचं  2024 चं पर्व संस्मरणीय ठरलं. कार्तिकनं त्याच्या फलंदाजीच्या जोरावर आरसीबीला अनेक सामने जिंकवून दिले. आयपीएल संपताच त्यानं निवृत्तीची घोषणा केली. आता तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन म्हणून भूमिका पार पाडणार आहे. दिनेश कार्तिकनं आता त्याची ऑल टाईम प्लेईंग 11 (Dinesh Karthik Playing 11) निवडली आहे. यामध्ये त्यानं सचिन तेंडुलकर पासून जसप्रीत बुमराहपर्यंत अनेकांना संघात स्थान दिलं आहे. मात्र, महेंद्रसिंह धोनीला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं गेलं नाही.  



दिनेश कार्तिकनं रोहित शर्मा, विराट कोहली यांना स्थान दिलं आहे. दिनेश कार्तिकनं क्रिकबझच्य प्रश्नांना उत्तरं देताना त्याची ऑल टाईम भारतीय प्लेईंग इलेव्हन निवडली. सलामीचे फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि विरेंद्र सेहवाग यांच्या नावांना त्यानं पसंती दिली. सेहवागनं भारतासाठी सलामीवीर म्हणून दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे रोहित शर्मा भारताचा यशस्वी कॅप्टन आहे. कार्तिकनं तिसऱ्या स्थानासाठी द वॉल राहुल द्रविड यांना स्थान दिलं आहे.  


कोहली युवराज मधल्या फळीत  


दिनेश कार्तिकनं मधल्या फळीत दमदार खेळाडूंची निवड केली आहे. सचिन तेंडुलकरची चौथ्या स्थानावर दिनेश कार्तिकनं निवड केली आहे. तर, विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे तर सहाव्या स्थानावर युवराज सिंगला स्थान देण्यात आलं आहे. कार्तिकनं रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना संघात स्थान दिलं आहे. झहीर खान आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाज म्हणून कार्तिकनं संघात निवडलं आहे. तर, अनिल कुंबळे ला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे.  


कार्तिकच्या ऑल टाईम प्लेईंग इलेव्हनमध्ये धोनीला स्थान मिळालेलं नाही. दिनेश कार्तिकनं हरभजन सिंगला संघात बॅकअप म्हणून स्थान देण्यात आलं आहे. मात्र, भारताला आयसीसीची तीन पदकं मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला कार्तिकनं स्थान दिलेलं नाही. एमएस धोनी बेस्ट फिनिशर मानला जातो मात्र त्याला कार्तिकनं संघात स्थान दिलं नाही धोनीनं भारतासाठी 90 कसोटी सामने खेळले त्यात त्यानं 4876 धावा केल्या. कसोटीत धोनीनं एक द्विशतक, सहा शतकं केली आहेत. त्यानं 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10773 धावा केल्या आहेत. 


संबंधित बातम्या :



Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानला जाणार का? जय शाह यांनी दिलं पीसीबीचं चिंता वाढवणारं उत्तर...