DC vs RR LIVE Score IPL 2026 : दिल्लीचा पलटवार! शेवटच्या षटकात राजस्थानला धूळ चारली, कॅपिटल्सचा 5 गडी राखून शानदार विजय
Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Update : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार असून दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने भिडणार आहेत.

पार्श्वभूमी
Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Update IPL 2026 : आयपीएलच्या 19व्या हंगामातील 62वा सामना 17 मे 2026 रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार असून दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स...More
आयपीएल 2026च्या 62 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर 5 गडी राखून शानदार विजय मिळवला आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक (टॉस) जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 193 धावा केल्या आणि दिल्लीसमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य ठेवले.
अटीतटीच्या वाटणाऱ्या या सामन्यात दिल्लीने 19.2 षटकांत 5 बाद 197 धावा करत अत्यंत सहजपणे विजयावर शिक्कामोर्तब केले.
4 चेंडू राखून दिल्लीने 5 गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला.
राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या राजस्थानने ध्रुव जुरेल आणि रियान पराग यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत आठ गडी गमावून 193 धावा केल्या.
दिल्लीकडून मिचेल स्टार्कने चार बळी घेतले, तर लुंगी एनगिडी आणि माधव तिवारी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.