David Miller GT vs DC IPL 2026: गुजरातने सामना 1 रनने जिंकला, पण सगळे दिल्लीच्या डेव्हिड मिलरकडे धावले; दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काय केले?
David Miller GT vs DC IPL 2026: एका धावेने सामना गमावल्यानंतर आणि स्वत:च्या एका निर्णयामुळे पराभव झाल्यानंतर डेव्हिड मिलर चांगलाच भावूक झाल्याचं पाहायला मिळाले

David Miller GT vs DC IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (DC VS GT) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने दिल्लीवर एका धावेने विजय मिळवला. 2 चेंडूंत 2 धावांची गरज असताना दिल्ली कॅपिटल्सच्या डेव्हिड मिलरने (David Miller) एकेरी धाव घेणे टाळल्याचा फटका बसल्याने दिल्लीला गुजरातविरुद्ध हातातील सामना गमवावा लागला. हा दिल्लीचा पहिला पराभव, तर गुजरातचा यंदाचा पहिलाच विजय ठरला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 20 षटकांत 4 बाद 210 धावा केलेल्या गुजरातने दिल्लीला 20 षटकांत 8 बाद 209 धावांवर रोखले.
दिल्ली कॅपिटल्सनं 211 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती.निसांका बाद झाला तेव्हा दिल्लीनं 76 धावा केल्या होत्या. यानंतर नितीश राणा, समीर रिझवी, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स चांगली कामगिरी करु शकले नाहीत. केएल राहुलनं 52 बॉलमध्ये 92 धावा केल्या. यामध्ये त्यानं 11 चौकार आणि 4 षटकार मारले. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी अखेरच्या दोन ओव्हरमध्ये 36 धावांची गरज होती. मोहम्मद सिराजच्या 19 व्या ओव्हरमध्ये दिल्लीनं 23 धावा काढल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला 13 धावा करायच्या होत्या. दिल्लीला 11 धावा करता आल्या. अखेरच्या 2 बॉलमध्ये दिल्लीला 2 धावा हव्या होत्या. मात्र पाचव्या बॉलवर डेव्हिड मिलरनं रन घेतली नाही. यामुळं दिल्लीला विजयासाठी 1 बॉल आणि 2 धावा हव्या होत्या. अखेरच्या बॉलवर मिलरला फटका मारता आला नाही आणि कुलदीप यादव धावबाद झाला आणि गुजरातनं विजय मिळवला. (GT vs DC IPL 2026)
डेव्हिड मिलर भावूक, गुजरात-दिल्लीचे खेळाडू धावले- (David Miller Emotional After Lose Match By 1 Run Against Gujarat)
एका धावेने सामना गमावल्यानंतर आणि स्वत:च्या एका निर्णयामुळे पराभव झाल्यानंतर डेव्हिड मिलर चांगलाच भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. सामना संपल्यानंतर डेव्हिड मिलर प्रचंड नाराज होता. यावेळी गुजरातचा कर्णधार शुभमन गिल, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज यांच्यासह अनेक खेळाडूंनी डेव्हिड मिलरला धीर दिला. तसेच दिल्लीचा कर्णधारही लगेच डेव्हिड मिलरला भेटला आणि त्याची समजूत काढून धीर देण्याचा प्रयत्न करताना दिसला.
JOS BUTTLER - ICE COLD UNDER PRESSURE. 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 8, 2026
- Ran out Kuldeep when 2 were needed on the last ball and avoided the Super Over. 🔥 pic.twitter.com/zxgWRuZwb5
गुजरातनं केल्या 210 धावा- (GT vs DC IPL 2026)
गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 4 बाद 210 धावा केल्या होत्या. गुजरात टायटन्सकडून जोस बटलर, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतक केल्यानं ते 210 धावांपर्यंत पोहोचू शकले. गुजरातकडून शुभमन गिलनं सर्वाधिक 70 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारनं 2 विकेट घेतल्या. गुजरातचा साई सुदर्शन 7 बॉलमध्ये 12 धावा करुन बाद झाला. जोस बटलर यानं 27 बॉलमध्ये 52 धावा केल्या. कुलदीप यादवनं बटलरला बाद केलं. शुभमन गिलनं 45 बॉलमध्ये 70 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर यानं 55 धावा केल्या. तर ग्लेन फिलिप्स 14 धावा करुन नाबाद राहिला.
संबंधित बातमी:




















