David Miller-Ryan Rickelton Video : दक्षिण आफ्रिकेतील टी20 लीग SA20 2026 सध्या रंगतदार वळणावर आहे. शुक्रवारी झालेल्या 10व्या सामन्यात पार्ल रॉयल्स आणि एमआय केपटाउन (Paarl Royals vs MI Cape Town SA20) यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. पार्लच्या बोलँड पार्क मैदानावर झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात पार्ल रॉयल्सने एमआय केपटाउनवर एका धावेने विजय मिळवत या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना पार्ल रॉयल्सने 181 धावा केल्या. प्रत्युत्तर एमआय केपटाउनने जोरदार झुंज दिली, पण संघाला 180 धावांवरच समाधान मानावे लागले. परिणामी, राशिद खानच्या नेतृत्वाखालील एमआय केपटाउनला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
Live मॅचमध्ये नेमकं काय घडलं?, प्रेक्षकही चक्रावले
या सामन्यादरम्यान क्रिकेटप्रेमींना एक भन्नाट आणि मजेशीर क्षण पाहायला मिळाला. सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दक्षिण आफ्रिकेचे दोन स्टार खेळाडू डेविड मिलर आणि रायन रिकेल्टन थेट मैदानावर कुस्ती करताना दिसत आहेत. दोघेही जमिनीवर कोसळले आणि प्रेक्षकांसह समालोचकांनाही हसू आवरेना.
आधी पकडलं, मग उचलून थेट जमिनीवर आपटलं!
हा मजेदार प्रकार दुसऱ्या डावात घडला. एमआय केपटाउनचा सलामीवीर रायन रिकेल्टन आक्रमक फलंदाजी करत होता. तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने मिडऑफकडे फटका मारत एक धाव घेतली. तिथे पार्ल रॉयल्सचा कर्णधार डेविड मिलर उभा होता.
धाव पूर्ण करताना रिकेल्टन थोडासा तोल गमावून घसरला, त्याचा हातातून बॅटही निसटली. तो मिलरजवळ येताच मिलरने मजेत त्याला पकडलं आणि थेट जमिनीवर आपटलं. व्हिडिओमध्ये दोघेही हसत-खेळत मैदानावर पडलेले दिसतात. हा क्षण पाहून समालोचकही गंमत करत म्हणाले, “बहुधा दोघे UFC साठी सराव करतायत...”
राशिद खानच्या टीमचा सलग चौथ्या पराभव
डिफेंडिंग चॅम्पियन एमआय केपटाउन यंदाच्या हंगामात अजूनही विजयाच्या शोधात आहे. कागदावर सर्वात मजबूत वाटणारा हा संघ अद्याप जिंकू शकलेला नाही. आतापर्यंत संघाने 4 सामने खेळले असून चारही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. परिणामी, पॉइंट्स टेबलमध्ये एमआय केपटाउन सध्या तळाशी आहे.
हे ही वाचा -
IND Squad vs NZ ODI Series : मोहम्मद शमी, गिल IN, पांड्या, बुमराह OUT...; न्यूझीलंडविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing XI