CSK vs SRH Live Update IPL 2026 : चेन्नईचा गड राखण्यात ऋतुराज अपयशी, पॅट कमिन्सच्या पलटवारने हाय-व्होल्टेज सामन्यात घातला धुमाकूळ, CSKला 5 गड्यांनी चारली धूळ
Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Update : चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील 63वा सामना 18 मे रोजी चेन्नईच्याएम.ए. चिदंबरम स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.
किरण महानवरLast Updated: 18 May 2026 11:41 PM

पार्श्वभूमी
Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live Update In Marathi : आज चेपॉकच्या मैदानावर आयपीएल 2026 मधील सर्वात हायव्होल्टेज लढतींपैकी एक रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स...More
Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live Update In Marathi : आज चेपॉकच्या मैदानावर आयपीएल 2026 मधील सर्वात हायव्होल्टेज लढतींपैकी एक रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील 63वा सामना 18 मे रोजी चेन्नईच्याएम.ए. चिदंबरम स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ ठरणार आहे.चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 12 पैकी 6 सामने जिंकले असून 12 गुणांसह संघ अजूनही प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवून आहे. मात्र उरलेले सामने जिंकणे सीएसकेसाठी अत्यावश्यक बनले आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास चेन्नईची प्लेऑफची वाट जवळपास बंद होऊ शकते. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाड करताना दिसणार आहे.दुसरीकडे, सनराइजर्स हैदराबादची कामगिरी या हंगामात दमदार राहिली आहे. सनरायझर्स हैदराबादने 12 पैकी 7 सामने जिंकून 14 गुण मिळवले आहेत. टॉप-2 मध्ये स्थान मजबूत करण्यासाठी हैदराबाद पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्स चेन्नईसमोर मोठं आव्हान उभं करण्यासाठी सज्ज आहे.हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर सीएसकेचं पारडं जड दिसतं. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 23 आयपीएल सामने खेळले गेले असून त्यात चेन्नईने 15 वेळा विजय मिळवला आहे, तर हैदराबादला फक्त 8 सामने जिंकता आले आहेत. विशेष म्हणजे चेपॉकमध्ये सीएसकेचा दबदबा कायम राहिला आहे. मात्र आयपीएल 2026 मध्ये चित्र बदलताना दिसलं. 18 एप्रिलला झालेल्या याच हंगामातील पहिल्या भिडतीत SRH ने चेन्नईला धक्का देत विजय खेचून आणला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात सीएसके बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार, तर SRH विजयाची मालिका कायम ठेवण्याच्या इराद्याने खेळणार आहे.हे ही वाचा -Ind vs Afg Test Squads : बुमराहला आराम, रोहित शर्मा अनफिट? अफगाणिस्तानविरुद्ध '**या' 15 खेळाडूंना मिळणार संधी, जाणून घ्या Squads
CSK vs SRH Live Update IPL 2026 : चेन्नईचा गड राखण्यात ऋतुराज अपयशी, पॅट कमिन्सच्या पलटवारने हाय-व्होल्टेज सामन्यात घातला धुमाकूळ, CSKला 5 गड्यांनी चारली धूळ
आयपीएल 2026 च्या 63 व्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने (SRH) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) त्यांच्याच घरच्या मैदानावर 5 गडी राखून पराभव केला.
चेन्नईने दिलेले 181 धावांचे आव्हान हैद्राबादने 19 व्या षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
इशान किशन आणि हेनरिक क्लासन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर हैद्राबादने हा विजय साकारला.