CSK vs DC Score : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास

CSK vs DC Live Score Update In Marathi : आयपीएल 2026 मधील 18वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एम.ए. चिदंबरम स्टेडियम येथे रंगणार आहे.

किरण महानवरLast Updated: 11 Apr 2026 11:34 PM

पार्श्वभूमी

Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Update Marathi News :  शनिवारी आयपीएल 2026 मधील 18वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एम.ए. चिदंबरम स्टेडियम येथे रंगणार आहे....More

CSK vs DC Score : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास

आयपीएल 2026 च्या 18 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला 23 धावांनी पराभूत केले.


सलग तीन सामने गमावल्यानंतर, सीएसकेचा या हंगामातील हा पहिला विजय आहे. 


दिल्ली कॅपिटल्सचा चार सामन्यांमधील हा दुसरा पराभव आहे. 


या विजयासह, चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत 10 व्या स्थानावरून 9 व्या स्थानावर झेप घेत दोन गुणांचे खाते उघडले आहे.