CSK vs DC Score : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास
CSK vs DC Live Score Update In Marathi : आयपीएल 2026 मधील 18वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एम.ए. चिदंबरम स्टेडियम येथे रंगणार आहे.
LIVE

Background
Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Update Marathi News : शनिवारी आयपीएल 2026 मधील 18वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एम.ए. चिदंबरम स्टेडियम येथे रंगणार आहे. पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला आहे. संघाने सलग तीन सामने गमावले असून गुणतालिकेत तळाशी घसरला आहे. दुसरीकडे, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकत चांगली सुरुवात केली आहे. मात्र, त्यांचा मागील सामना थरारक ठरला होता, ज्यामध्ये गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर एक धाव राखत विजय मिळवला.
आजच्या आयपीएल सामन्यांबाबत बोलायचे झाल्यास, शनिवारी डबल हेडर सामने खेळवले जात आहेत. मुल्लानपूर येथे पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना खेळला गेला. तर दिवसातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
CSK vs DC Score : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास
आयपीएल 2026 च्या 18 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला 23 धावांनी पराभूत केले.
सलग तीन सामने गमावल्यानंतर, सीएसकेचा या हंगामातील हा पहिला विजय आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा चार सामन्यांमधील हा दुसरा पराभव आहे.
या विजयासह, चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत 10 व्या स्थानावरून 9 व्या स्थानावर झेप घेत दोन गुणांचे खाते उघडले आहे.
CSK vs DC Live Score : संजूच्या शतकाने मैदान हादरलं, म्हात्रेच्या बॅटिंगने दिल्लीला घाम फुटला; CSK ची तुफानी बॅटिंग, जाणून घ्या Live अपडेट्स
संजू सॅमसनच्या शानदार शतकाच्या जोरावर चेन्नईने 212 धावा केल्या.
दिल्लीच्या गोलंदाजांना विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करावा लागला.
आता दिल्लीसमोर विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य आहे.



















