World Cup Latest Points Table 2023: भारतात सुरु असेलला विश्वचषक आता उत्तरार्धाकडे झुकलाय. आज भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वानखेडेवर लढत होणार आहे. आतापर्यंत विश्वचषकात 32 सामने झाले आहेत. म्हणजेच 66.66% वर्ल्ड कप संपलाय. गुणतालिकेत दररोज मोठा फेरबदल होतोय. दक्षिण आफ्रिका सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. पण आज टीम इंडियाने विजय मिळवल्यास आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर घसरेल. आफ्रिकेचा क्विंटन डिकॉकच्या नावावर सर्वाधिक दावा आहेत. गोलंदाजीत कोण आघाडीवर... विश्वचषकातील आतापर्यंतच्या सर्व आकडेवारीवर नजर मारुयात...
क्या है पॉइंट्स टेबल का हाल?
टीम | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रन रेट |
1. दक्षिण अफ्रीका | 7 | 6 | 1 | 12 | 2.290 |
2. इंडिया | 6 | 6 | 0 | 12 | 1.405 |
3. ऑस्ट्रेलिया | 6 | 4 | 2 | 8 | 0.970 |
4. न्यूझीलंड | 7 | 4 | 3 | 8 | 0.484 |
5. पाकिस्तान | 7 | 3 | 4 | 6 | -0.024 |
6. अफगानिस्तान | 6 | 3 | 3 | 6 | -0.718 |
7. श्रीलंका | 6 | 2 | 4 | 4 | -0.275 |
8. नेदरलँड्स | 6 | 2 | 4 | 4 | -1.277 |
9. बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
10. इंग्लंड | 6 | 1 | 5 | 2 | -1.652 |
वर्ल्ड कप 2023 चे टॉप आंकडे
सर्वोच्च धावसंख्या : दक्षिण आफ्रिकेने सात ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरोधात निर्धारित 50 षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात 428 धावांचा डोंगर उभारला होता. आतापर्यंत विश्वचषकातील ही सर्वोच्च धावंसख्या होय.
सर्वात मोठा विजय : ऑस्ट्रेलियाने 25 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरोधात 309 धावांनी विजय मिळवला होता. सध्याच्या विश्वचषकातील हा सर्वात मोठा विजय होय.
सर्वाधिक धावा : दक्षिण अफ्रीकेचा सलामी फलंदाज क्विंटन डिकॉक यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आहे. क्विंटन डॉककने सात डावात 545 धावांचा पाऊस पाडला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रचित रविंद्र (415) आणि तिसऱ्या क्रमांकावर डेविड वॉर्नर (413) आहे. रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे.
सर्वात मोठी खेळी : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात सर्वात मोठ्या खेळीचा रेकॉर्ड्सही क्विंटन डिकॉकच्या नावावर आहे. डिकॉकने 24 ऑक्टोबर रोजी 174 धावांची खेळी केली होती.
सर्वाधिक शतक - यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक शतकांचा विक्रम क्विंटन डि कॉकच्या नावावर आहे. डिकॉकने आतापर्यंत चार शतके ठोकली आहेत.
सर्वाधिक षटकार : भारतीय कर्णधार रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषका सर्वाधिक षटकार मारले आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत सहा डावात 20 षटकार ठोकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर डेविड वॉर्नर (19) आणि तिसऱ्या स्थानावर डिकॉक (18) आहे.
सर्वाधिक विकेट : ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सन यांनी प्रत्येकी 16-16 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहच्या नावावर 14 विकेट्स आहेत.
सर्वोत्कृष्ट गोलंदाजी : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात 54 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. शामीनेही न्यूझीलंडविरोधात पाच विकेट्स घेतल्यात.
आणखी वाचा :
World Cup 2023: आख्खा पाकिस्तान भारताच्या बाजूने उभा, टीम इंडियाच्या विजयासाठी 'देव पाण्यात'!