World Cup 2023 Points Table : विश्वचषकातील आज झालेल्या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठी खळबळ झाली आहे. गतविजेंत्या इंग्लंडचा 229 धावांचा पराभव अन् श्रीलंकेने विजयाचे खाते उघडले... त्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. इंग्लंडचा संघाचा दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव झाला. इंग्लंडचा संघ आता नवव्या क्रमांकवर घसरला आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाने आपले तिसऱ्या क्रमांकाचे स्थान अधिक मजबूत केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा रनरेट सर्वाधिक तगडा आहे. दुसरीकडे श्रीलंका संघाने विजयाचे खाते उघडत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आज श्रीलंका संघाने नेदरलँडचा पराभव करत यंदाच्या विश्वचषकातील विजयाचे खाते उघडले. 


अफगाणिस्तानचा संघ सध्या तळाला आहे. चार सामन्यात तीन पराभव स्विकारावे लागणाऱ्या अफघाणिस्तान संघाचा नेटरनर सर्वात खराब आहे. इंग्लंड संघाचेही चार सामन्यात तीन पराभव झाले आहेत. गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत दोन गुणांसह नवव्या स्थानावर विराजमान आहे. गतविजेता इंग्लंडचा संघाची यंदाच्या विश्वचषकात दैयनीय अवस्था झाली आहे. इंग्लंडला चार सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे


पाकिस्तानची घसरण - 
शुक्रवारी ऑस्ट्रेलियाकडून 62 धावांनी पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघाची गुणतालिकेत घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या संघाची चौथ्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर पोहचला आहे.  पाकिस्तान संघाने चार सामन्यात दोन पराभव आणि दोन विजय झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचेही चार सामन्यात चार गुण झाले आहेत. पण सरस रनरेटमुळे ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर आहे.



आघाडीचे संघ कोणते ?


न्यूझीलंड आणि भारतीय संघ विश्वचषकात आतापर्यंत अजेय आहेत. या दोन्ही संघाने सलामीचे चार सामने जिंकले आहेत. रनरेट सरस असल्यामुळे न्यूझीलंडचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये रविवारी सामना होणार आहे. धर्मशाला येथे दोन्हीपैकी एका संघाचा विजयरथ थांबणार आहे. जिंकणारा संघ अव्वल स्थान काबिज करेल, त्याशिवाय सेमीफायनलच्या आणखी जवळ जाईल. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे चार सामन्यात सहा गुण आहेत.  आफ्रिकेचा रनरेट सर्वात चांगला आहे. 



इंग्लंडच्या संघाला पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. इंग्लंडच्या संघाच्या सहाव्या क्रमांकावरुन नवव्या स्थानी घसरण झाली आहे. बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानी पोहचला आहे. तर सातव्या क्रमांकावर नेदरलँड आणि आठव्या स्थानी श्रीलंका हे संघ आहेत. बांगलादेश, नेदरलँढ, श्रीलंका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघाने आपापल्या चार सामन्यात तीन पराभव स्विकारले आहेत.