Cricket News: भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज या कसोटी सामन्यातील पाचवा दिवस आहे. दुसरा कसोटी सामनाही भारत जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताला जिंकण्यासाठी 121 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसापर्यंत भारताने एका विकेटच्या मोबदल्यात 63 धावा केल्या होत्या. आता, टीम इंडियाला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी फक्त 58 धावांची आवश्यकता आहे. वेस्ट इंडिजसाठी हा सामना जिंकणे आता अशक्य आहे. याचदरम्यान, क्रिडाविश्वातील विश्वास न बसणारी एक घटना घडली होती. यामध्ये एका चेंडूत फलंदाजांनी तब्बल 286 धावा केल्या होत्या. 

Continues below advertisement

15 जानेवारी 1894 रोजी लंडनमधील "पाल-मॉल गॅझेट" या वृत्तपत्राने या सामन्यावर एक वृत्त प्रकाशित केले. ऑस्ट्रेलियातील बर्नबरी ग्राउंडवर व्हिक्टोरिया आणि स्क्रॅच इलेव्हन यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात ही अनोखी घटना घडल्याचा दावा वृत्तपत्राने केला होता. त्या सामन्यात एकाच चेंडूत 286 धावा झाल्या होत्या. 

सामन्यात नेमकं काय घडलेलं? (286 Runs In One Ball)

सीमारेषेच्या आत झाड: सामन्यादरम्यान, व्हिक्टोरियाच्या एका फलंदाजाने एक जोरदार शॉट मारला आणि चेंडू सीमारेषेच्या आत असलेल्या झाडाच्या फांद्यात अडकला.

Continues below advertisement

अंपायरचा निर्णय: स्क्रॅच इलेव्हन संघाने पंचांकडे चेंडू हरवल्याचे अपील केले, परंतु पंचांनी अपील फेटाळले. चेंडू झाडावर स्पष्ट दिसत असल्याने, त्यांनी निर्णय दिला की चेंडू हरवलेला घोषित करता येणार नाही.

फलंदाज धावत राहिले: जोपर्यंत चेंडू झाडावर अडकला होता तोपर्यंत दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर धावत राहिले. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे चेंडू परत मिळवण्याचा कोणताही मार्ग नव्हता, म्हणून पंचांनी झाड कापण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर केला, पण झाड इतक्या लवकर कसे कापले जाऊ शकते? शेवटी, चेंडू झाडावरून बाहेर काढण्यासाठी बंदूकीचा वापर करण्यात आला. बंदूकीने चेंडूवर निशाणा साधला आणि अनेक प्रयत्नांनंतर झाडावर अडकलेला चेंडू अखेर खाली पडला.

विक्रमी धावा: चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 286 धावा केल्या होत्या. असे म्हटले जाते की दोन्ही खेळाडूंनी अंदाजे 6 किलोमीटर धावले होते. या घटनेची आजही चर्चा आहे, परंतु त्यावर विश्वास ठेवणे कोणालाही कठीण आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Virat Kohli IPL 2026 : विराट कोहलीचा RCBला रामराम? नव्या कॉन्ट्रॅक्टवर साइन करण्यास दिला नकार; IPLपूर्वीच घेतला धक्कादायक निर्णय, जाणून घ्या Inside Story...