IND A vs AUS A नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याची सुरुवात आशिया कप स्पर्धेनंतर होईल. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या दरम्यान सुरु राहील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळणार आहे. मात्र, यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा अ संघ भारताचा दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यात 4 दिवसांचे दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं अ संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया अ संघात सॅम कोनस्टासला स्थान देण्यात आलं आहे. सॅम कोनस्टासनं जसप्रीत बुमराह सोबत पंगा घेतला होता. त्याला ऑस्ट्रेलिया अ संघात संधी मिळाली आहे.
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अचं वेळापत्रक
ऑस्ट्रेलियाच्या अ संघाचा भारत दौरा 16 सप्टेंबर पासून सुरु होऊन 5 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहील. या दौऱ्यावर पाच सामने खेळले जातील. यामध्ये दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन कसोटी सामने लखनौ आणि कानपूरमध्ये होतील. तर, एकदिवसीय सामने कानपूरमध्ये होणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मुख्य संघाची मालिका सुरु होण्यापूर्वी अ संघांमधील सामने संपणार आहेत.
पहिली कसोटी मॅच: 16-19 सप्टेंबर, कानपूरदूसरी कसोटी मॅच: 23-26 सप्टेंबर, लखनौपहली वनडे: 30 सप्टेंबर, कानपूरदूसरी वनडे: 3 ऑक्टोबर, कानपूरतीसरा वनडे: 5 ऑक्टोबर, कानपूर
4 दिवसांच्याकसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा अ संघ
जेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, जॅक एडवर्ड्स, आरोन हार्डी, कॅम्पबेल केलावे, सॅम कोनस्टास, नाथन मॅकस्वीनी, लांस मॉरिस, टॉड मर्फी, फर्गस ओ'नील, ओलिवर पीक, जोश फिलिप, कोरी रोचिचियोली आणि लियाम स्कॉट
वनडे साठी ऑस्ट्रेलियाचा अ संघ
कूपर कोनोली, हॅरी डिक्सन, जॅक एडवर्ड्स, सॅम इलियट, जॅक फ्रेजर-मॅकगर्क, आरोन हार्डी, मॅकेंजी हार्वे, टॉड मर्फी, तनवीर संघा, लियाम स्कॉट, लॅची शॉ, टॉम स्ट्रॅकर, विल सदरलँड आणि कॅलम विडलर