Chennai Super Kings won by 5 wickets Lucknow Super Giants IPL 2026 : आयपीएल 2026 च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) प्रवास अत्यंत निराशाजनक ठरला आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्सने (CSK) लखनऊचा 5 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे, चेन्नईने सलग तिसरा विजय नोंदवत प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःचे स्थान भक्कम केले आहे.

Continues below advertisement

उर्विल पटेलचे ऐतिहासिक अर्धशतक

204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात वादळी झाली. सलामीवीर उर्विल पटेलने लखनऊच्या गोलंदाजीच्या चांगलाच सामाचार घेतला. त्याने अवघ्या 13 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकून आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान खेळींपैकी एक साकारली. उर्विलच्या या झंझावातामुळे चेन्नईने कठीण वाटणारे लक्ष्य लिलया पार केले. विशेष म्हणजे, 2019 नंतर चेन्नईने 180 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

Continues below advertisement

त्याआधी इंग्लिसचे 'वादळ'

लखनऊच्या डावाची सुरुवात अत्यंत स्फोटक झाली. सलामीवीर जोश इंग्लिशने चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत फक्त 33 चेंडूत 85 धावांची धडाकेबाज खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 10 चौकार आणि 6 षटकार ठोकले. मिचेल मार्श (10) स्वस्तात बाद झाला असला तरी, इंग्लिशने पहिल्या पॉवरप्लेमध्येच लखनौला मोठी धावसंख्या गाठून दिली.

मध्य फळीत स्वस्तात बाद झाले दिग्गज

मोठ्या सुरुवातीनंतर लखनऊची मध्य फळी काहीशी गडबडली. निकोलस पूरन (1), कर्णधार ऋषभ पंत (15) आणि एडन मार्कराम (6) हे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. त्यामुळे एका क्षणी 130 धावांवर 5 गडी बाद अशी स्थिती लखनऊची झाली होती. शेवटच्या षटकांमध्ये शाहबाज अहमदने संयमी आणि आक्रमक फलंदाजी केली. त्याने 25 चेंडूत 43 धावांची नाबाद खेळी करून संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याला अक्षत रघुवंशी (18) आणि हिम्मत सिंह (17) यांनी मोलाची साथ दिली.

गुणतालिका आणि प्लेऑफची समीकरणे

या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. चेन्नईने आतापर्यंत 11 पैकी 6 सामने जिंकले असून त्यांचे 12 गुण झाले आहेत. याउलट, लखनऊ सुपर जायंट्स 11 सामन्यांपैकी फक्त 3 सामने जिंकू शकले असून 6 गुणांसह ते दहाव्या स्थानावर आहेत. उर्वरित सामने जिंकले तरी लखनऊ आता प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा -

Urvil Patel News : 6,6,6,6,6,4,6... उर्विल पटेलने ठोकले IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक, सेलीब्रेशन करताना खिशातून काढली चिठ्ठी अन्... नेमकं काय घडलं?