एक्स्प्लोर

Champions Trophy 2025 South Africa: पाऊस अन् दक्षिण अफ्रिकेचं दुदैवी नाते; पावसामुळे 3 वेळा आयसीसी स्पर्धेतून बाहेर

Champions Trophy 2025 South Africa: पावसामुळे याआधी देखील दक्षिण आफ्रिकेला आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. 

Champions Trophy 2025 South Africa: दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला (South Africa Cricket Team) क्रिकेटमध्ये 'चोकर्स' म्हटले जाते. बाद फेरीत वारंवार बाहेर पडणे ही आफ्रिकन संघाची जुनी सवय आहे. दक्षिण आफ्रिका सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये (Champions Trophy 2025) ग्रुप बी च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, परंतु उपांत्य फेरीतील दक्षिण आफ्रिकेचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र काल ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे उपांत्यफेरीत पोहचण्यासाठी दक्षिण अफ्रिकेला पुढील सामना काहीही करुन जिंकावा लागेल. पावसामुळे याआधी देखील दक्षिण आफ्रिकेला आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. 

1992 विश्वचषकाची उपांत्य फेरी-

1992 च्या विश्वचषकात, दक्षिण आफ्रिकेने साखळी टप्प्यातील आठ पैकी पाच सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत त्यांचा सामना इंग्लंडशी होणार होता. आफ्रिकेने इंग्लंडला 252 धावांवर रोखून आपल्या विजयाचा पाया रचला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना, जेव्हा आफ्रिकेला 13 चेंडूत 22 धावांची आवश्यकता होती, तेव्हा पाऊस सुरू झाला. जेव्हा सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा मैदानात लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. आफ्रिकेला एका चेंडूत जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता होती. या नियमावरून बराच वाद झाला, पण दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव पत्कारावा लागला.

2003 चा विश्वचषक-

उपांत्य फेरीत जाण्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेशी सामना होता. आफ्रिकेसाठी ही 'करो या मरो'ची लढाई होती. या सामन्यात श्रीलंकेने 268 धावा केल्या होत्या. 269 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आफ्रिकेने एकेकाळी 6 विकेट्स गमावून 229 धावा केल्या. संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूत 40 धावा करायच्या होत्या. त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि अखेर सामना रद्द घोषित करण्यात आला. दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले, जे दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी पुरेसे नव्हते.

2022 टी-20 विश्वचषक-

2022 च्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्ध सामना होता. या सामन्यात देखील पावसाने खो घातला. सामन्यातील षटकांची संख्या 9 षटकांपर्यंत कमी करण्यात आली आणि झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 79 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू होऊन फक्त दोन षटके झाली होती तेव्हा पाऊस सुरू झाला. सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा संघाला 7 षटकांत 64 धावांचे लक्ष्य मिळाले. पुन्हा पाऊस पडला आणि शेवटी सामना रद्द घोषित करण्यात आला. अशाप्रकारे, दक्षिण आफ्रिका गटात तिसऱ्या स्थानावर राहिली, जी त्यांना उपांत्य फेरीत नेण्यासाठी पुरेशी नव्हती.

संबंधित बातमी:

Champions Trophy 2025: पावसाने खेळ बिघडवला, ग्रुप B मधील चारही संघांना सेमीफायनलमध्ये पोहचण्याची संधी, कोण मारणार बाजी?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड
वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड
Why BCCI Ban Rohit Yadav : BCCIने आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड केली, पण एक चूक भोवली; रोहित यादववर थेट 2 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं?
BCCIने आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड केली, पण एक चूक भोवली; रोहित यादववर थेट 2 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं?
India vs Japan T20 Match : आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा; जपानविरुद्ध पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना, कधी-कुठे होणार मॅच?
आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा; जपानविरुद्ध पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना, कधी-कुठे होणार मॅच?

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget