Champions Trophy 2025 Pak vs NZ: आजपासून (19 फेब्रुवारी) आयसीसी चॅम्पियन्स ट्राफी 2025 च्या (Champions Trophy 2025) स्पर्धेला सुरवात होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये (Pakistan vs New Zealand) आज पहिली लढत होणार आहे. पाकिस्तानमधील कराची मैदानात हा सामना खेळण्यात येईल. दुपारी 2.30 वाजल्यापासून पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या सामन्याला सुरुवात होईल. आठ संघांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाईल. जरी पाकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करत असले तरी, टीम इंडिया सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर जेतेपदाचा सामनाही दुबईमध्येच खेळवला जाईल.

खेळपट्टी कशी असेल?

कराचीच्या नॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य आहे. या मैदानात मोठ्या प्रमाणात धावा होतात. याच मैदानावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 353 धावांचे लक्ष्य गाठले होते.नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - 

फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद आणि हरिस रौफ.

न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - 

रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, जेकब डफी आणि विल ओ'रोर्क.

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने तुम्ही तुमच्या मोबाईलवर कसा आणि कुठे पाहू शकता?

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने JioHotstar वर मोफत सामने बघता येणार आहे. तर टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार पाहता येणार आहे. 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वेळापत्रक- (ICC Champions Trophy 2025 Schedule)

19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

अंतिम आणि उपांत्य फेरीचे सामने कुठे होणार -

4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई5 मार्च – उपांत्य फेरी 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर9 मार्च - अंतिम - गद्दाफी स्टेडियम, लाहोर (टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचल्यास ठिकाण दुबई असेल)

संबंधित बातमी:

Champions Trophy 2025 Team India: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज; भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव, सर्व खेळाडूंचे PHOTO