Champions Trophy 2025 Gautam Gambhir: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीवर (Champions Trophy 2025) आपलं नाव कोरलंय. दुबईच्या मैदानात झालेल्या थरारक फायनलमध्ये न्यूझीलंडला त्यांनी चार विकेट्स आणि एक ओव्हर राखून पराभूत केलं. तब्बल 12 वर्षांनी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केलाय. अंतिम सामन्यात विजयासाठीचं 252 धावांचं आव्हान भारताने 49 षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. 

Continues below advertisement


न्यूझीलंडविरुद्धच्या विजयामुळे होळीआधीच भारताने विजयाचा रंग उधळलाय. विशेष म्हणजे एकही सामना न गमावता भारताने ही स्पर्धा जिंकलीय. भारताच्या विजयानंतर संपूर्ण देशभरात सेलिब्रेशन करण्यात आलं. भारतीय संघाच्या खेळाडूंनी देखील मैदानात जोरदार सेलिब्रेशन केलं. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) मुलाखत घेतली. यावेळी गौतम गंभीरने नवज्योतसिंग सिद्धू यांची शायरीही म्हटली. यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी गौतम गंभीरला एक भांगडा नृत्य करण्याची विनंती केली. गौतम गंभीरने सुरुवातीला हात जोडत नकार दिला. मात्र नवज्योतसिंग सिद्धू यांच्या वारंवार विनंतीनंतर गौतम गंभीरने हात वरत करत त्यांचा मान राखला. 






टीम इंडियाच्या विजयानंतर गौतम गंभीर काय म्हणाला?


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतासाठी हा विजय ऐतिहासिक होता. भारताच्या विजयात मुख्य प्रशिक्षक गंभीरची भूमिकाही महत्त्वाची राहिली आहे. अंतिम सामना सुरु असताना गौतम गंभीर सुरुवातीपासून एकाठिकाणी बसून होता. याचरम्यान त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील दिसले. या सामन्यात चुकीचा फटका मारत बाद झाल्यानंतर गौतम गंभीर संतापल्याचे देखील दिसून आले. मात्र भारताने सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. टीम इंडियाच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये 1.4 बिलियन भारतीयांना शुभेच्छा...जय हिंद...असं बोलत गौतम गंभीरने टीम इंडियाच्या विजयाचे फोटो शेअर केले आहेत. 


संबंधित बातमी:


Champions Trophy 2025 Virat Kohli: मेरा भारत महान! एकीकडे जंगी सेलीब्रेशन, दुसरीकडे मायेचा हात; विराट कोहली तिच्याजवळ गेला अन्..., PHOTO


Yuzvendra Chahal Champions Trophy 2025: मिस्ट्री गर्लसोबत बसलेल्या युझवेंद्र चहलला विवेक ओबेरॉयचा एक सवाल; तिही खुदकन हसली, VIDEO


भारतानं जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी, VIDEO: