एक्स्प्लोर

Champions Trophy 2025 Gautam Gambhir: एकाच जागी बसला, संतापला, टाळ्या वाजवल्या अन् शेवटी हसला; टीम इंडियाच्या विजयानंतर गौतम गंभीर म्हणाला...

Champions Trophy 2025 Gautam Gambhir: भारतीय संघाच्या विजयात मुख्य प्रशिक्षक गंभीरची भूमिकाही महत्त्वाची राहिली आहे.

Champions Trophy 2025 Gautam Gambhir: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीवर (Champions Trophy 2025) आपलं नाव कोरलंय. दुबईच्या मैदानात झालेल्या थरारक फायनलमध्ये न्यूझीलंडला त्यांनी चार विकेट्स आणि एक ओव्हर राखून पराभूत केलं. तब्बल 12 वर्षांनी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केलाय. अंतिम सामन्यात विजयासाठीचं 252 धावांचं आव्हान भारताने 49 षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. 

रोहित शर्माच्या 76 आणि श्रेयस अय्यरच्या 48 धावांच्या खेळीने संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. रोहितने 7 चौकार 3 षटकार तर श्रेयसने 2 चौकार 2 षटकार ठोकले. कुलदीप यादव, वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन विकेट्स घेत किवी टीमला सात बाद 251 वर रोखलं. जडेजाने 10 षटकांमध्ये अवघ्या 30 धावा देत एक फलंदाज बाद केला. मिचेलने 101 चेंडूंत 63 तर, ब्रेसवेलने 40 चेंडूंमध्ये नाबाद 53 धावा करत किवींना अडीचशे पार नेलं. 

टीम इंडियाच्या विजयानंतर गौतम गंभीर काय म्हणाला?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतासाठी हा विजय ऐतिहासिक होता. भारताच्या विजयात मुख्य प्रशिक्षक गंभीरची भूमिकाही महत्त्वाची राहिली आहे. अंतिम सामना सुरु असताना गौतम गंभीर सुरुवातीपासून एकाठिकाणी बसून होता. याचरम्यान त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील दिसले. या सामन्यात चुकीचा फटका मारत बाद झाल्यानंतर गौतम गंभीर संतापल्याचे देखील दिसून आले. मात्र भारताने सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. टीम इंडियाच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये 1.4 बिलियन भारतीयांना शुभेच्छा...जय हिंद...असं बोलत गौतम गंभीरने टीम इंडियाच्या विजयाचे फोटो शेअर केले आहेत. 

भारताच्या विजयात गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली-

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी गौतम गंभीरवर सतत प्रश्न उपस्थित केले जात होते. भारताला कसोटीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर गौतम गंभीरवर अनेकवेळा टीका वाढली. पण टीम इंडियाच्या विजयाने आता टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गंभीरने पडद्यामागे राहून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गौतम गंभीरने गोलंदाजीमध्ये एक विशेष प्लॅन बनवला होता. 

अंतिम सामन्यात रोहित-अय्यरने तुफानी खेळी-

रोहित शर्माने अंतिम सामन्यात नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्माने 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर सुरुवातीपासून संयमी खेळी केली. श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या. केएल राहुल 34 धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 252 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने 49 षटकांत लक्ष्य गाठले.

संबंधित बातमी:

Champions Trophy 2025 Virat Kohli: मेरा भारत महान! एकीकडे जंगी सेलीब्रेशन, दुसरीकडे मायेचा हात; विराट कोहली तिच्याजवळ गेला अन्..., PHOTO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ICC Tournaments Venue Shift : कंगाल पाकिस्तानच्या कुरापतींमुळे टीम इंडियाला मोठा झटका! वर्ल्ड कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताबाहेर शिफ्ट होणार?, जय शाह घेणार मोठा निर्णय
कंगाल पाकिस्तानच्या कुरापतींमुळे टीम इंडियाला मोठा झटका! वर्ल्ड कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताबाहेर शिफ्ट होणार?, जय शाह घेणार मोठा निर्णय
J&K Cricket Team Ranji Trophy Final : जम्मू-काश्मीरच्या पोरांनी करून दाखवलं, 67 वर्षांचा वनवास संपला! पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये एन्ट्री; जेतेपदासाठी कोणाला भिडणार?
जम्मू-काश्मीरच्या पोरांनी करून दाखवलं, 67 वर्षांचा वनवास संपला! पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये एन्ट्री; जेतेपदासाठी कोणाला भिडणार?
Mohammed Shami News : शेर अभी जिंदा है! मोहम्मद शमीला 9 विकेट्स, रणजी सामन्यात धारदार गोलंदाजी, धुरंधर कामगिरीने BCCI चं टेन्शन वाढवलं
शेर अभी जिंदा है! मोहम्मद शमीला 9 विकेट्स, रणजी सामन्यात धारदार गोलंदाजी, धुरंधर कामगिरीने BCCI चं टेन्शन वाढवलं
IND vs NED Playing 11 : जसप्रीत बुमराहसह 3 स्टार खेळाडू OUT, नेदरलँड्सविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11
जसप्रीत बुमराहसह 3 स्टार खेळाडू OUT, नेदरलँड्सविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर 'हा' नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर 'हा' नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
10 राज्यांमधील राज्यसभेच्या 37 जागांसाठी बिगुल वाजला, 16 मार्च रोजी मतदान; शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदींचा कार्यकाळ संपणार, महाराष्ट्र आणि तमिळनाडूत सर्वाधिक जागा रिक्त
10 राज्यांमधील राज्यसभेच्या 37 जागांसाठी बिगुल वाजला, 16 मार्च रोजी मतदान; शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदींचा कार्यकाळ संपणार, महाराष्ट्र आणि तमिळनाडूत सर्वाधिक जागा रिक्त
Bhigwan Kidnapping Case: अपहरण झालेल्या तरूणीला शोधण्यासाठी 6 टीम रवाना; कॉल डिटेल्स अन् व्हॉट्सॲपचाही डेटा मागवला, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप मोर्चासाठी जाणार
अपहरण झालेल्या तरूणीला शोधण्यासाठी 6 टीम रवाना; कॉल डिटेल्स अन् व्हॉट्सॲपचाही डेटा मागवला, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप मोर्चासाठी जाणार
रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
AI समिटमध्ये जागतिक नाचक्की सुरुच! 'चायनिज रोबोटिक डॉग' आमचाच शोध म्हटलेल्या गॅलगोटियास विद्यापीठाची थेट समिटमधून हकालपट्टी; व्हिडिओ व्हायरल होताच वाद पेटला
AI समिटमध्ये जागतिक नाचक्की सुरुच! 'चायनिज रोबोटिक डॉग' आमचाच शोध म्हटलेल्या गॅलगोटियास विद्यापीठाची थेट समिटमधून हकालपट्टी; व्हिडिओ व्हायरल होताच वाद पेटला
Pune Crime News: जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जनस्थळी नेलं; अमानुषपणे मारहाण अन् सामुहिक अत्याचाराचा संशय, नंतर दगडाच्या खाणीत..., घटनेनं पुणे हादरलं
जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जनस्थळी नेलं; अमानुषपणे मारहाण अन् सामुहिक अत्याचाराचा संशय, नंतर दगडाच्या खाणीत..., घटनेनं पुणे हादरलं
अजितदादांच्या घातपाताचा मुद्दा मांडताना भाजपचे ट्रोलर्स मला लक्ष्य का करत आहेत? विमानतळ प्राधिकरणाला दिलेली गोपनीय कागदपत्रे, माहिती या ट्रोलर्सना पुरवली जाते; रोहित पवारांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या घातपाताचा मुद्दा मांडताना भाजपचे ट्रोलर्स मला लक्ष्य का करत आहेत? विमानतळ प्राधिकरणाला दिलेली गोपनीय कागदपत्रे, माहिती या ट्रोलर्सना पुरवली जाते; रोहित पवारांचा गंभीर आरोप
Embed widget