Rohit Sharma in IND vs BAN Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून एकदिवसीय मालिकेत पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. पण या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच अनुपस्थित आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत (India vs Bangladesh 1st Test) तो संघात नव्हता. ज्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो फिट होऊन संघात परतेल अशी माहिती समोर येत होती. पण आता त्याच्या प्रकृतीबाबत संघ व्यवस्थापन कोणतीत जोखीम पत्करणार नसल्याने त्याला विश्रांती देण्याकरता तो दुसऱ्या कसोटीत संघात नसेल अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध होणार नाही. रोहित संघात सामील होईल अशी अपेक्षा होती पण आता तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने दुसरा सामनाही तो खेळणार नाही असं समोर येत आहे. भारताच्या आगामी मालिकेतील महत्त्वाचे सामने पाहता बीसीसीआय आणि निवड समितीला कोणताही धोका पत्करायचा नाही, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कसोटी मालिकेत भारताची आघाडी
भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं (Ind vs Ban) मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली.
कसा आहे भारतीय संघ?
शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
हे देखील वाचा-