Asia cup 2023, Tilak Varma : भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आज आशिया चषकातील सुपर ४ मधील अखेरचा सामना होत आहे. या सामन्यात टीम इंडियात बदल करण्यात आलाय. मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मा याला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलाय. तिलक वर्मा याने आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरोधात भारताच्या टी 20 संघात पदार्पण केले होते. या मालिकेत तिलक वर्माने सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर तिलक वर्माला आशिया चषकासाठी टीम इंडियाचे तिकिट मिळाले. तिलक वर्मा याने आज वनडेमध्ये पदार्पण केलेय. 


बांगलादेशिरोधातमुंबई इंडियाचा शिलेदार मैदानात, बांगलादेशविरोधात टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल भारताच्या प्लेईंग ११ मध्ये तिलक वर्माला संधी मिळाली आहे. नाणेफेकीआधी तिलक वर्मा याला वनडे कॅप देण्यात आली. तिलक वर्मा याचे वनडेमध्ये पदार्पण झालेय. राहुल अथवा इशान किशन यांच्यापैकी एका खेळाडूला आराम देण्यात येणार.. हे निश्चित... तिलक वर्मा संघात आल्यामुळे कोणत्या खेळाडूला आराम दिला जाणार, हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.






तिलक वर्मा याच्याबद्दल....


तिलक वर्मा याने आयपीएलमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केलेय. मुंबईचे आघाडीचे फलंदाज फ्लॉप गेल्यानंतर तिलक वर्मा याने एकहाती डाव सांभाळत आपली प्रतिभा दाखवून दिली होती. तिलक वर्मा याने वेस्ट इंडिजविरोधात भारताच्या टी 20 संघात पदार्पण केले. तिलक वर्मा याला अद्याप एकदिवसीय सामन्यात संधी मिळालेली नाही. मधल्या फळीत तिलक वर्मा याने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधलेय. वेस्ट इंडिजविरोधातही त्याने आक्रमक फलंदाजी करत सर्वांची वाह वाह मिळवली होती. तिलक वर्मा याने आतापर्यंत आयपीएलमधील 25 डावात 740 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 84 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.  सहा आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये तिलक वर्मा याने 173 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धसतकाचा समावेश आहे. 15 चौकार आणि सात षटकार ठोकले आहेत. टी20 मध्ये एक विकेटही त्याने घेतली आहे.