एक्स्प्लोर

क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेलं घडलं; पोलार्डच्या बॅटीला चेंडू न लागताही स्टँडमध्ये, पंचांच्या निर्णयाने सगळे खेळाडू चक्रावले, VIDEO

Canada Super60 Video Viral : कॅनडामध्ये सुरू असलेल्या कॅनडा सुपर 60 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्रिकेट चाहत्यांना एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक प्रसंग पाहायला मिळाला.

Canada Super60 Video Viral : कॅनडामध्ये सुरू असलेल्या कॅनडा सुपर 60 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्रिकेट चाहत्यांना एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक प्रसंग पाहायला मिळाला. व्हँकुव्हरमधील बीसी प्लेस स्टेडियमवर टोरोंटो सिक्सर्स आणि मिसिसॉगा मास्टर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात एक चेंडू सीमारेषा ओलांडून थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला. मात्र, तरीही फलंदाजी करणाऱ्या संघाला षटकाराच्या सहा धावा मिळाल्या नाहीत. 

नेमकं काय घडलं?

ही घटना टोरोंटो सिक्सर्सच्या डावातील नवव्या षटकात घडली. मिसिसॉगा मास्टर्सचा वेगवान गोलंदाज अली खान गोलंदाजी करत होता, तर आक्रमक फलंदाज किरॉन पोलार्ड स्ट्राईकवर होता. अली खानने पोलार्डला अतिशय वेगवान बाउन्सर टाकला. या चेंडूने इतकी उसळी घेतली की तो पोलार्डच्या डोक्यावरून तसेच यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून थेट स्टँडमध्ये जाऊन पडला. हे दृश्य पाहून मैदानावरील समालोचकांनी तात्काळ वाईडसह षटकार असल्याचे मानले. मात्र, मैदानावरील पंचांनी केवळ वाईडचा इशारा केला. अखेर टोरोंटो सिक्सर्सच्या खात्यात एकूण 5 धावा जमा झाल्या. त्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित चाहते आणि समालोचकही काही काळ संभ्रमात पडले.

षटकार का दिला नाही?

पंचांचा निर्णय मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (MCC) क्रिकेट नियमांनुसार होता. नियम 19.7 नुसार, चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागल्यानंतर तो जमिनीवर न पडता सीमारेषेबाहेर गेला, तरच त्याला षटकार दिला जातो. पण या प्रसंगी चेंडू पोलार्डच्या बॅटला लागलाच नव्हता. तो थेट त्याच्या डोक्यावरून सीमारेषेबाहेर गेला. त्यामुळे हा षटकार ठरू शकत नाही. नियमांनुसार, फलंदाजाच्या बॅटला न लागलेला चेंडू सीमारेषेबाहेर गेला, तर तो बाय, लेग बाय किंवा वाईड असला तरी जास्तीत जास्त चार सीमारेषेच्या धावा मिळतात. त्यामुळे या चेंडूवर 4 बाय + 1 वाईड 5 धावा टोरोंटोच्या खात्यात जमा झाल्या. म्हणजेच, चेंडू स्टँडमध्ये जाऊन पडला असला तरी तो बॅटला लागला नसल्यामुळे पोलार्डला किंवा टोरोंटोला षटकार मिळाला नाही.

टोरोंटो सिक्सर्सची अंतिम फेरीत धडक

दरम्यान, या सामन्यात टोरोंटो सिक्सर्सने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांत 4 बाद 130 धावा केल्या. किरॉन पोलार्डने अवघ्या 16 चेंडूंमध्ये 40 धावांची आक्रमक खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना मिसिसॉगा मास्टर्सकडून ॲलेक्स लीसने 11 चेंडूंमध्ये 39 धावा करत सामन्यात रंगत आणली. मात्र, त्यांचा संघ निर्धारित षटकांत 121 धावांपर्यंतच पोहोचू शकला. अखेर टोरोंटो सिक्सर्सने 9 धावांनी विजय मिळवत कॅनडा सुपर 60 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम सामन्यात टोरोंटो सिक्सर्सचा सामना व्हँकुव्हर अँकर्सशी होणार आहे.

हे ही वाचा -

IND vs WI 3rd ODI : ICCची मोठी कारवाई! तिसऱ्या वनडेनंतर भारत-वेस्ट इंडिज दोघांनाही एकाच वेळी सुनावली शिक्षा, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताचा डाव 89 धावांवर आटोपला, गौतम गंभीरनं फलंदाजांना झापलं, चौथ्या वनडेत पराभव होताच गंभीर भडकला
भारताचा डाव 89 धावांवर आटोपला, चौथ्या वनडेत पराभव होताच गौतम गंभीर फलंदाजांवर भडकला
IND vs NZ 4th ODI : रोहित, विराटसह जवळपास अर्धा संघ शून्यावर बाद, तिघांची दुहेरी धावसंख्या, 7 एक्स्ट्रा धावांनी लाज राखली, टीम इंडियाला न्यूझीलंडने सळो की पळो करुन सोडलं!
रोहित, विराटसह जवळपास अर्धा संघ शून्यावर बाद, तिघांची दुहेरी धावसंख्या, 7 एक्स्ट्रा धावांनी लाज राखली, टीम इंडियाला न्यूझीलंडने सळो की पळो करुन सोडलं!
IND vs NZ 4th ODI : टीम इंडियासाठी काळा दिवस! रोहित-विराटची दाणादाण, न्यूझीलंडने 244 धावांनी लोळवलं, वनडे इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव
टीम इंडियासाठी काळा दिवस! रोहित-विराटची दाणादाण, न्यूझीलंडने 244 धावांनी लोळवलं, वनडे इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव
IND vs NZ 4th ODI LIVE : टीम इंडियाचा न्यूझीलंडने 234 धावांनी उडवला धुव्वा, इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा धक्का!
IND vs NZ 4th ODI LIVE : टीम इंडियाचा न्यूझीलंडने 234 धावांनी उडवला धुव्वा, इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा धक्का!
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget