Navneet Dhaliwal Retirement : टी-20 वर्ल्ड कप 2026 मधून संघ बाहेर पडताच कॅनडाच्या माजी कर्णधार नवनीत धालीवाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 19 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे अफगाणिस्तानविरुद्ध होणारा सामना हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. 37 वर्षीय धालीवाल याने सांगितले की, हा निर्णय त्याने आधीच घेतला होता आणि या वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तानविरुद्धचा सामना हा त्याच्या करिअरचा शेवट असेल, हे त्याने निश्चित केले होते.

Continues below advertisement

आता कोचिंग क्षेत्रात पाऊल

धालीवाल आता आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांची आठवण करून दिली. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी कॅनडाला पात्र ठरवणे, स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण धावा करणे आणि कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणे हे त्याच्यासाठी विशेष ठरले. आता तो प्रशिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त करत असून, युवा खेळाडूंना मार्गदर्शन करून त्याचे भविष्य घडवण्याचा त्याचा मानस आहे.

Continues below advertisement

‘कॅनडामध्ये क्रिकेटची प्रगती....’

न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतक ठोकणाऱ्या युवराज सामराचे कौतुक करताना धालीवाल म्हणाला की, कीवी संघ हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. अशा मजबूत संघाविरुद्ध शतक झळकावणे म्हणजे कॅनडामध्ये क्रिकेट झपाट्याने प्रगती करत असल्याचा ठोस पुरावा आहे.

नवनीत धालीवालची कारकीर्द

धालीवाल आपल्या कारकिर्दीचा शेवट टी-20 फॉर्मेटमध्ये कॅनडासाठी सर्वाधिक यशस्वी फलंदाज म्हणून करत आहेत. त्याने 2019 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 48 सामन्यांतील 46 डावांत 10 अर्धशतकांसह 1,305 धावा केल्या. 2024 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करताना 18 सामन्यांतील 17 डावांत 4 अर्धशतकांसह 456 धावा त्यांनी केल्या. त्याने कॅनडासाठी 29 टी-20 आणि 4 वनडे सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. त्याच्या नेतृत्वाखाली कॅनडाने 21 सामने जिंकले. अशा प्रकारे, नवनीत धालीवाल याने कॅनडाच्या क्रिकेट इतिहासात आपली ठळक छाप उमटवत नव्या प्रवासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा -

Pakistan T20 World Cup 2026 : शाहिद आफ्रिदी भडकला! स्वतःच्याच जावयाला नको नको ते बोलले, शेवटी पाकिस्तान क्रिकेटचा मोठा निर्णय, टीममधूनचं काढलं